27 मार्च ते 4 एप्रिल जिल्ह्यातील बँका बंद! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 26, 2021

27 मार्च ते 4 एप्रिल जिल्ह्यातील बँका बंद!

 27 मार्च ते 4 एप्रिल जिल्ह्यातील बँका बंद!

चला... बँकांची कामे आजच करा.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जर तुम्ही बँकेची कामं करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्हाला बँकेसंदर्भातील कोणतंही काम करायचं असेल तर ते आजचं उरकून घ्या. कारण 27 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान बँकांना सुट्टी असल्याने बँकिंग सेवा या कालावधीत ठप्प राहणार आहे. मार्च हे आर्थिक वर्ष असल्याने बँकांच्या कामकाजासाठी मार्च महिना महत्वाचा असतो. पण मार्चअखेरीस होळी, शनिवार, रविवार आणि बँकांच्या वर्षाचा आर्थिक हिशेब करण्यास बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे 27 मार्चपासून 4 मार्चपर्यंत 7 दिवस बँका बंद असून यादिवसात फक्त एकच दिवस बँकेचे कामकाज सुरू राहणार आहे. यापार्श्वभूमीवर शनिवारपासून देशभरातील खासगी आणि सरकारी बँका बंद राहणार आहे. जर तुम्ही आज आपले बँकांचे कामकाज पूर्ण केले नाही तर तुम्हाला थेट 3 एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आरबीआयने बँकांसाठी सुट्टीचे वेळापत्रक देखील जाहीर केलं आहे. या महिन्यांचा चौथा शनिवार असल्याने 27 मार्च रोजी बँक बंद असणार आहे. तर 28 मार्च रोजी रविवार आहे. यासोबतच 29 मार्च रोजी होळी या सणाची सुट्टी असल्याने बँका बंद राहणार आहेत. 30 मार्च रोजी पाटणा शहर वगळण्यात आले असून इतर ठिकाणी बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे. यासह 30 मार्च रोजी मार्च अखेरचा दिवस तर 31 मार्च रोजी आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस तसेच सार्वजनिक व्यवहार बंद असल्याने बँका बंद राहणार आहेत. तर 1 एप्रिलला बँकांचे लेखा-जोखाचा दिवस, 2 एप्रिल दिवशी गुड फ्रायडे तर 4 एप्रिल रोजी रविवार असल्याने सरकारी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग कॅलेंडरनुसार 27 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान केवळ दोनच दिवस बँकांचे कामकाज राहणार आहे.
27 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीचे संपूर्ण वेळापत्रक
27 मार्च 2021 - महिन्याचा चौथा शनिवार, 28 मार्च 2021 - रविवार, 29 मार्च 2021 - होळी, 30 मार्च 2021 - होळीच्या निमित्ताने फक्त पाटण्यात सुट्टी, 31 मार्च 2021 - आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस, 1 एप्रिल 2021 - बँकांचे लेखा, 2 एप्रिल 2021 - गुड फ्राइडे, 3 एप्रिल 2021 - सर्व बँका खुल्या राहतील, 4 एप्रिल 2021 - रविवार

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here