जिल्हाधिकार्‍यांनी केली कर्जत मध्ये कोरोनासंदर्भात पाहणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 25, 2021

जिल्हाधिकार्‍यांनी केली कर्जत मध्ये कोरोनासंदर्भात पाहणी.

 जिल्हाधिकार्‍यांनी केली कर्जत मध्ये कोरोनासंदर्भात पाहणी.



नगरी दवंडी


कर्जत- कर्जत शहरातील महात्मा गांधी विद्यालयातील आणि उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथील कोरोना सेंटरची पाहणी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी बुधवारी केली. स्थानिक प्रशासनाला सूचना ही देण्यात आल्या. 

         मागील महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट पुन्हा सक्रिय झाली असून कर्जत शहर आणि तालुक्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय आणि महात्मा गांधी विद्यालयातील कोव्हिड केअर  सेंटरची पाहणी बुधवारी केली. यावेळी याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र क्षीरसागर,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदीप सांगळे, निवासी औद्योगिक अधिकारी बेलंबे, उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले, प्रांताधिकारी अर्चना नष्टे आदी उपस्थित होते.

               कर्जत पंचायत समितीच्या सभागृहात स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागातील अधिकारी - कर्मचाऱ्याशी सवांद साधला. कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनाने दिलेले नियम काटेकोरपणे पाळत सहकार्य करावे असे आवाहन केले. तसेच या काळात गर्दी असणाऱ्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळत प्रशासनाने विहित संख्या स्पष्ट केली आहे त्याची पुरेपूर खबरदारी घेत अनावश्यक गर्दी टाळावी असे म्हंटले. यासह कोरोना नियम मोडणाऱ्या व्यक्ती, मंगल कार्यालये यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सुचना उपस्थित अधिकारी वर्गास करण्यात आल्या. नागरिकांनी कोरोनाचे लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करीत त्यावर योग्य उपचार घ्यावे. यासह त्यांच्या संपर्कातील व्यक्तींनी स्वत: पुढे येत आरोग्य विभागाला सहकार्य करावे असे ही जिल्हाधिकारी भोसले यांनी नागरिकांना आवाहन केले. यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव,  तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ कुंडलिक अवसरे आदी

उपस्थित होते.

No comments:

Post a Comment