बीड पाठोपाठ या जिल्ह्यातही लॉक डाऊन जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 24, 2021

बीड पाठोपाठ या जिल्ह्यातही लॉक डाऊन जाहीर

 बीड पाठोपाठ या जिल्ह्यातही लॉक डाऊन जाहीर



नगरी दवंडी


मुंबई - राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने काही जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन जाहीर केला आहे. बीड पाठोपाठ नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये लोक डाऊन जाहिर करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यात व शहरातील अनेक भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्हा प्रशासनासह महापालिकेकडून उपाययोजना राबवण्यात येत आहेत. पण नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नाईलाजास्तव २५ मार्च ते चार एप्रिल पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे, अशी माहिती जिल्हाधिका-यांनी दिली आहे.

परभणीत आज (दि. २४) सायंकाळी ७ वाजल्यापासून जिल्ह्यात कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. ही संचारबंदी १ एप्रिलच्या सकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहे. तरी नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे. दरम्यान, परभणीतील संचारबंदी दरम्यान किराणा, भाजीपाला, दुधविक्री, खत बियाणे दुकाने बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र किराणा सामान, दूध घरपोच पुरवणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितल्याचे कळते आहे.

परभणी जिल्ह्यात संचारबंदीदरम्यान काय बंद नसेल?

शासकीय कार्यालये, रुग्णालये मेडिकल, बँका, स्पर्धा परीक्षेसाठीच्या अभ्यासिका, वाचनालये, पाणी पुरवठा करणारी वाहने, स्वस्त धान्य दुकाने, माध्यमांची कार्यालये, प्रतिनिधी, गॅस, पेट्रोल पंप यांना संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment