नियम मोडणाऱ्या विरूध्द प्रशासन आक्रमक, या शहरातील १४ दुकाने ७ दिवसांसाठी सील. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 25, 2021

नियम मोडणाऱ्या विरूध्द प्रशासन आक्रमक, या शहरातील १४ दुकाने ७ दिवसांसाठी सील.

 नियम मोडणाऱ्या विरूध्द प्रशासन आक्रमक,

 या शहरातील १४ दुकाने ७ दिवसांसाठी सील.नगरी दवंडी

जामखेड - राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता  जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे कमालीचे आग्रेसिव्ह झाले असून जे व्यवसाईक कोरोनाचे नियम (मास्क, सामाजिक अंतर,सॅनिटायजर) पाळणार नाहीत व आपल्या दुकानातील गर्दीवर नियंत्रण ठेवणार नाहीत अशा दुकानांवर कारवाई करण्यात येणार असून ती दुकाने सात दिवस पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून अशा प्रकारची कारवाई करण्यास जामखेड शहरात सुरूवात करण्यात आली असून या अंतर्गत शहरातील 

समृध्दी दुध, अंदुरे ब्रदर्स, अरिहंत गोळी सेंटर, घाडगे एजन्सी, NK power tools शेजारी,

 स्वयंभुराज किराणा, महाराष्ट्र चायनीज सेंटर, शिवशंकर इलेक्ट्रॉनिक, रविंद्र कलेक्शन, त्रिमूर्ती भेळ सेंटर, इंदोर कलेक्शन, समृध्दी पेढेवाले, महाराष्ट्र शु सेंटर, मुंबई मोबाईल शाॅपी अशी १४ दुकाने सात दिवसांसाठी शील करण्यात आली आहेत.

काल दि. २४ रोजी जिल्हा अधिकारी राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना बाबत  जामखेड येथे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत ग्रामीण भागासाठी तहसीलदार व शहरी भागासाठी मुख्याधिकारी यांना कारवाई व उपाय योजना करण्याचे अधिकार देण्यात आले असून याच अधिकाराचा वापर करत नगरपरिषद प्रशासने आज १४ दुकाने शील करण्याची कारवाई केली असून अशी कारवाई निरंतर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

   दि. २५ रोज झालेल्या आढावा बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे सीईओ राजेंद्र क्षीरसागर, डॉ शोभा आरोळे, रविदादा आरोळे, प्रांताधिकारी अर्चना नष्टे,तहसीलदार विशाल नाईकवाडे, ना. तहसीलदार नवनाथ लांडगे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, तालुका आरोग्यधिकारी डॉ सुनिल बोराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जानकर तलाठी सुखदेव कारंडे सर्कल नंदकुमार गव्हाणे आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here