सुशासन प्रतिष्ठानच्यावतीने आ. अरुण जगतापांच्या वाढदिवसानिमित्त अनामप्रेम संस्थेस मास्क व सॅनिटायझर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 26, 2021

सुशासन प्रतिष्ठानच्यावतीने आ. अरुण जगतापांच्या वाढदिवसानिमित्त अनामप्रेम संस्थेस मास्क व सॅनिटायझर

 सुशासन प्रतिष्ठानच्यावतीने आ. अरुण जगतापांच्या वाढदिवसानिमित्त अनामप्रेम संस्थेस मास्क व सॅनिटायझर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः आपल्या व प्रियजनांच्या आनंदात आपण समाजातील वंचित घटकांनाही सामावून घेतले पाहिजे.  या घटकांच्या गरजा पुरवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले पाहिजे. याच भावनेतून सुशासन प्रतिष्ठानच्यावतीने आ. अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क व सॅनिटायझर वाटपचा उत्कृष्ट उपक्रम राबवून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात एक चांगले वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. दुर्लक्षित घटकांना आपल्या छोट्याशा मदतीनेही त्यांना मोठा आधार मिळत असतो. त्यामुळे असे उपक्रम इतरांनीही राबवावे, असे आवाहन अक्षय कांबळे यांनी केले.
सारसनगर येथील सुुशासन प्रतिष्ठानच्यावतीने आमदार अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त गांधी मैदान येथील अनामप्रेम संस्थेस मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंभु नवसुपे, अक्षय कांबळे, भैरवनाथ खंडागळे, बाबासाहेब कर्पे, अनामप्रेमचे अजित कुलकर्णी आदि उपस्थित होते.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंभु नवसुपे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आ.अरुणकाका यांच्या वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांतून साजरा व्हावा, अशी त्यांची इच्छा होते, त्यानुसार आम्ही सामाजिक संस्थांना मदत देऊन हा आनंदोत्सव साजरा केला आहे. प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत असते, असे सांगून आ.अरुणकाकांना दिर्घाष्यु लाभो अशी प्रार्थना केली.
याप्रसंगी अजित कुलकर्णी यांनी सामाजिक संस्थांच्या अशा उपक्रमांमुळे अशा संस्थांना आधार मिळत आहे, असे सांगून सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here