दिलीप गांधी हे उत्कृष्ठ संघटक होते : संघटनमंत्री रवी अनासपुरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 19, 2021

दिलीप गांधी हे उत्कृष्ठ संघटक होते : संघटनमंत्री रवी अनासपुरे

 दिलीप गांधी हे उत्कृष्ठ संघटक होते : संघटनमंत्री रवी अनासपुरे



नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळा खासदार झालेले व स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम करणारे दिलीप गांधी हे उत्कृष्ठ संघटक होते. भरतीय जनता पार्टीचे शहरात व जिल्ह्यात पायामुळे त्यांनी रोवली. त्यांच्या अकस्मात झालेल्या निधनाने नुसते नगरचेच नाहीतर संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात भाजपाचे उत्तर महाराष्ट्राचे संघटन मंत्री रवी अनासपुरे यांनी स्व.दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.
माजी केंद्रीयमंत्री दिलीप गांधी यांचे  बुधवारी दिल्लीत करोनामुळे निधन झाले होते. त्यांच्य पार्थिवावर गुरुवारी नगरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी खासदार दिलीप गांधी यांचे दिल्लीत कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्यावर गुरवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. सजवलेल्या रथात त्यांचा पार्थिवदेह ठेवण्यात आला होता. शहरातील प्रमुख मार्गावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी रथावर हजारो नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ही अंत्ययात्रा लक्ष्मिकारंजा चौकातील भाजपच्या कार्यालया जवळ आल्यावर रथावर पुष्पवृष्टी करून भाजपाचा ध्वज, शाल व पुष्पहार अर्पण करण्यात आला. याठिकाणी प्रदेश भाजपच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित असलेले उत्तर महाराष्ट्राचे संघटन मंत्री रवी अनासपुरे उपस्थित होते. यावेळी खा.सुजय विखे, भाजपा शहरजिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, भाजप कार्यकारणी सदस्य अभय आगरकर,,महापौर बाबासाहेब वाकळे, संघटन सरचिटणीस अ‍ॅड. विवेक नाईक, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, शिवाजी दहींडे, संतोष गांधी, अजय चितळे, पंकज जहागीरदार, वसंत राठोड, सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदे, युवा मोर्चाचे महेश तवले, आशिष अनेचा, ज्ञानेश्वर काळे, शशांक कुलकर्णी, साठे, किशोर कटोरे, भरत सुरतवाला, वर्मा,  सर्व भाजपाचे नगरसेवक यांच्या सह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.
यावेळी भैय्या गंधे म्हणाले, स्व.दिलीप गांधी यांनी जनसंघा पासून पक्षाचे निष्ठेने कामे केली आहेत. त्यांच्या भरीव योगदानामुळे आज पक्षाला बळकटी मिळाली आहे. त्यांच्या झालेल्या दुख:द निधाने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
खा. सुजय विखे म्हणाले, नगर शहरातील व मतदारसंघात मोठी विकास कामे करण्यासाठी माजी खासदार गांधी यांनी मोठा पाठपुरावा केला होता. त्यांच्यामुळेच अनेक प्रश्न मार्गी लागली आहेत. नगर शहरातून जाणारा बहुचर्चित उड्डाणपूलही गांधी यांच्यामुळेच मार्गे लागला. माझे आजोबा स्व. बाळासाहेब विखे व गांधी यांचे कौटुंबिक संबंध होते, हेच संबंध सुवेंद्र गांधी व मी पुढेही जपेल.

No comments:

Post a Comment