राहुरी तहसीलदारांना विजजोड बंद न करण्यासाठी निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 19, 2021

राहुरी तहसीलदारांना विजजोड बंद न करण्यासाठी निवेदन

 राहुरी तहसीलदारांना विजजोड बंद न करण्यासाठी निवेदन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
माका ः राहुरी तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने,पक्षअध्यक्ष संस्थापक महादेवजी जाणकर तसेच पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी शरदभाऊ बाचकर यांच्या मार्गदर्शनाखाली,शेतकरयांच्या शेतीपंपाची विज तोडणी बंद करण्यात यावी,बंद करण्यात आलेली विज पुन्हा सुरू करण्यात यावी,यासंदर्भात नायब तहसीलदार तळेकर यांना लेखी निवेदनं पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नाना जुंधारे यांनी आपल्या सहकार्यांसमवेत दिले.                                  
याबाबत असे की,एकीकडे महाराष्ट्र सरकारने अधिवेशन काळात शेतीसंदर्भात विज कनेक्शन बंद करण्यात येणार नाही असे सांगितले असुन सुद्धा महावितरण कंपनी कडून सरसकट याबाबत विचार न करता विजतोडणी केली जात आहे.याअगोदर शेतकरी वर्ग कोरोना महासंकटाने तसेच अतिवृष्टीने मेटाकुटीस आला असल्याने विज तोडणी बंद करण्यात यावी.बंद केलेली विज पुन्हा सुरू करण्यात यावी.अन्यथा पक्षाच्या वतीने तसेच शेतकरयांसमवेत मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात येतील असे जिल्हाअध्यक्ष जुंधारे यांनी निवेदनात म्हटले आहे.याप्रसंगी जुंधारे यांच्या समवेत पक्षाच्या महिला जिल्हाअध्यक्षा सुवर्णाताई जरहाड,तालुका उपाध्यक्ष कपील लाटे,महिला तालुकाअध्यक्षा रेखा नरवडे,शेतकरी आघाडीचे नाना जगताप,अशोक होडगर तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here