सरन्यायाधीश बोबडेंनी सुचविलं. त्यांच्या उत्तराधिकारीचं नाव.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 24, 2021

सरन्यायाधीश बोबडेंनी सुचविलं. त्यांच्या उत्तराधिकारीचं नाव..

 सरन्यायाधीश बोबडेंनी सुचविलं. त्यांच्या उत्तराधिकारीचं नाव..

एन. व्ही. रमन्ना यांची केली शिफारस

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायलयाचे मुख्य न्यायाधीश एन. व्ही. रमन्ना हे देशाचे पुढील मुख्य न्यायाधीश अर्थात सरन्यायाधीश असणार आहे. विद्यमान सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी एन. व्ही. रमन्ना यांच्या नावाची शिफारस सरकारकडे पाठविली आहे. अलीकडेच, सरकारने त्यांना उत्तराधिकारी म्हणून त्याचे नाव पाठविण्यास सांगितले होते. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे 23 एप्रिल रोजी आपल्या पदावरून निवृत्त होणार आहेत. यानंतर एन. व्ही. रमन्ना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहेत. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी देशाचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन.व्ही. रमन्ना यांची शिफारस केली असून न्यायमूर्ती बोबडे यांचा  कार्यकाळ 23 एप्रिलपर्यंत आहे. बोबडे यांची शिफारस सरकारने मान्य केल्यास एन. व्ही. रमन्ना हे 24 एप्रिल रोजी शपथ घेतील. एन. व्ही. रमन्ना 17 फेब्रुवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनली.

No comments:

Post a Comment