आज जिल्ह्यात कोरोनाचा आकडा 600 च्या जवळ. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 24, 2021

आज जिल्ह्यात कोरोनाचा आकडा 600 च्या जवळ.

 आज जिल्ह्यात कोरोनाचा आकडा 600 च्या जवळ.नगरी दवंडी

नगर ः जिल्ह्यात सुरू असलेला काेराेनाचा उद्रेक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्बंध लादण्यात सुरुवात केली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन झाल्यास आस्थपना सात दिवसांसाठी बंद करण्याचे अधिकार तहसिलदारांना दिले आहेत. आजही काेराेनाबाधितांचा आकडा 600 च्या जवळ पाेहाेचला आहे. जिल्ह्यात आज 599 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. त्यात नगर शहरात 186 रुग्णांचा समावेश आहे. अहमदनगर शहर 186, राहाता 72, संगमनेर 29, श्रीरामपूर 83, नेवासे 22, नगर तालुका 21, पाथर्डी 34, अकाेले 06, काेपरगाव 21, कर्जत 20, पारनेर 13, राहुरी 33, भिंगार शहर 04, शेवगाव 29, जामखेड 05, श्रीगाेंदे 04 आणि इतर जिल्ह्यातील 17 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 51, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 390 आणि रॅपिड चाचणीमध्ये 158 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात कोरोना संसर्गाचे आकडे हे तीन अंकी आहेत. शहरातील वाढते आकडे हे महापालिका प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. कोरोना चा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सामाजिक संघटनांना हाताशी घेऊन शहरात दोन कोविड सेंटर सुरू केले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here