अल्पसंख्याकांच्या उन्नत्तीसाठी भाजपा सरकार कटीबद्ध- भैय्या गंधे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 5, 2021

अल्पसंख्याकांच्या उन्नत्तीसाठी भाजपा सरकार कटीबद्ध- भैय्या गंधे

 अल्पसंख्याकांच्या उन्नत्तीसाठी भाजपा सरकार कटीबद्ध- भैय्या गंधे

भाजप अल्पसंख्याक महिला आघाडीची जिल्ह्यात स्थापना


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सबका साथ सबका विकास नुसार सर्व समाजातील गरीब महिलांच्या नित्योपयोगी गरजांचा विचार करुन घेतलेले निर्णयमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा आधार मिळाला आहे. मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक पद्धत रद्द करण्याच्या धाडसी निर्णयाने मुस्लिम महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच गरजू महिलांना चुलीपासून मुक्तता मिळण्यासाठी उज्वला गॅस योजनांतर्गम मोफत गॅस वाटप, जनधन योजना, पंतप्रधान आवास योजना अशा अनेक योजनांमुळे गोरगरीबांचे प्रपंच उभे राहिले आहेत. अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी विशेष निधी व सवलती उपलब्ध करुन दिला आहे. समाजातील गरीब कुटूंबांना अशा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपाचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर शिक्षित महिला व स्वयंरोजगारातून तयार करण्यात येत असलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन शिबीराचे लवकरच आयोजन करण्यात येईल असे सांगून, भाजपा पक्षाची ध्येय-धोरणे अल्पसंख्यांक समाजापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न या संवादातून करण्यात येत असल्याचे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.
भाजपा अल्पसंख्याक आघाडीच्यावतीने महिला अल्पसंख्याक आघाडीची स्थापना करुन ओळखपत्रांचे वाटप शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संघटन सरचिटणीस अ‍ॅड.विवेक नाईक, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष हाजी अन्वर खान, प्रशांत मुथा, शेख अशपाक रहेमान, नदीम चाँद शेख, महिला अध्यक्ष अमरीन एजाज शेख, सरचिटणीस फरिदा अ.लतिफ शेख आदि उपस्थित होते.
याप्रसंगी अल्पसंख्याक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष अन्वर खान म्हणाले, भाजपा प्रणित केंद्रातील सरकारने सर्वसमाजाच्या उन्नत्तीसाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. त्याचा समाजाने फायदा करुन घ्यावा, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे भाजप अल्पसंख्यांक महिला आघाडीची कार्यकारिणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी महिला आघाडीचे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली ती पुढील प्रमाणे अध्यक्षा- अमरीन एजाज शेख, सरचिटणीस फरिदा अ.लतिफ शेख, उपाध्यक्षा जकिया अशपाक शेख, परविन शम्मू सय्यद, रुबिना अनिस शेख, खुर्शिद इब्राहिम सय्यद, सेक्रेटरी जास्मीन शाकिर शेख, मोहसिना शकिल शेख, महेरुन्नीसा जाफर शेख, अफसाना शौकत सय्यद, कार्यकारी सदस्य- आलिया जहिर पठाण, नसिमा आरिफ शेख, परविन अमिन शेख, मुबिना कदीर खान, सुमय्या शोएब शेख आदिंनी नियुक्ती करण्यात आली. यावेळी नूतन पदाधिकार्यांना ओळखपत्र देऊन पक्षात त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच सहचिटणीस फरिदा अ.लतिफ शेख यांच्या निवासस्थानास पक्षाच्या नावाची नेमप्लेट लावण्यात आली. आभार अ‍ॅड.विवेक नाईक यांनी मानले. या निवडीबद्दल खा.डॉ.सुजय विखे, माजी खा.दिलीप गांधी, सुनिल रामदासी, जगन्नाथ निंबाळकर, अ‍ॅड.तुषार पोटे आदिंनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment