काष्टी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसम ठार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 5, 2021

काष्टी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसम ठार

 काष्टी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसम ठार

श्रीगोंदा  -  नगर-दौंड महामार्गावर काष्टी येथील परिक्रमा कॉलेज समोर दि.४ रोजी रात्री ८:३० वाजता रस्त्याने पायी चाललेल्या ३५ वर्षीय अज्ञात इसमाला भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक देवून उडविले या धडकेत अज्ञात इसम जागीच ठार झाला. घटनेची माहिती समजताच श्रीगोंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञात वाहनाच्या विरोधात हे.कॉ. गोकुळ इंगवले यांच्या फिर्यादीवरुन पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       काष्टी येथील परिक्रमा कॉलेज समोर दि.४ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रस्त्याने पायी चाललेल्या ३५ वर्षीय अज्ञात इसमाला भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिली या धडकेत अज्ञात इसम जागीच ठार झाला. अपघाताची  माहिती काष्टी परिसरात पसरताच घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पो.हे.कॉ. गोकुळ इंगवले यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहन चालकाविरुद्ध श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here