नौदलात रुजू झाल्याबद्दल यश रणसिंग यांचा चाईल्ड लाईनच्या वतीने सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 5, 2021

नौदलात रुजू झाल्याबद्दल यश रणसिंग यांचा चाईल्ड लाईनच्या वतीने सत्कार

 नौदलात रुजू झाल्याबद्दल यश रणसिंग यांचा चाईल्ड लाईनच्या वतीने सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः चाईल्ड लाईनच्या वतीने भारतीय लष्कराच्या नौदलात रुजू झाल्याबद्दल यश रणसिंग यांचा सत्कार बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख यांच्या हस्ते झाला. यावेळी चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक महेश सुर्यवंशी, समुपदेशक आलिम पठाण, दत्ता रणसिंग, शाहिद शेख, अब्दुल खान, प्रविण कदम, राहुल कांबळे, पूजा पोपळघट, शुभांगी माने, राहुल वैराळ, उमेश कोरडे, हर्ष रणसिंग आदी उपस्थित होते.
हनिफ शेख म्हणाले की, बिकट परिस्थितीवर मात करुन ध्येय गाठण्याचा आनंद सर्वोच्च आहे. संघर्षाशिवाय जीवनात यश नाही. जीवनात ध्येय असेल तरच यश मिळते, नाहीतर आयुष्य भरकटते. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या यश रणसिंग भारतीय नौदलाच्या भरतीत पात्र होऊन खडतर प्रशिक्षण पुर्ण करुन नुकतेच तो विशाखापट्टणम येथे देशसेवेच्या कार्यासाठी रुजू झाल्याचा हा सर्वांना अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. महेश सुर्यवंशी यांनी चाईल्ड लाईनच्या वतीने रणसिंग यांना पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here