नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची निदर्शने - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 31, 2021

नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची निदर्शने

 नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची निदर्शने

अतिक्रमणे नियमीत करुन बांधकाम करण्यास परवानगी मिळण्याची मागणी

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मौजे नांदगाव (ता.नगर) ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असणार्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अतिक्रमणे नियमीत करुन घरकुल बांधण्यास परवानगी मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष सखाराम सरक, अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, कैलास पटारे, नाथसाहेब सरक, श्याम उमाप, विलास वाघमारे आदी सहभागी झाले होते.                
मौजे नांदगाव (ता. नगर) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जनतेतून सरपंच निवडणूक झाली होती. नुतन सरपंच यांनी या ठिकाणी रहिवाशांना घरकुलासाठी जागा मंजूर करण्यासाठी शासन दरबारी सर्वतोपरीने प्रयत्न करून जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन घरकुल लाभार्थ्यांना दिले होते. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत सर्व कागदपत्रांची पूर्तता करून लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक घरकुलांच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येत आहे. नुकतेच झालेल्या वादळामध्ये लाभार्थींचे झपरे देखील उडून गेले आहे. राहण्यासाठी घर नसल्याने लाभार्थी संकटात सापडले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. गट नंबर 46 मध्ये 34 लाभार्थी आहेत. परंतु गट नंबर 46 हा के.के. रेंज रेड झोन मध्ये असल्याने यासाठी योग्य निर्णय घ्यावा मात्र गट नंबर 14 व 2 मधील लाभार्थ्यांना तत्काळ बांधकाम परवानगी देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here