शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास तरुणांसाठी प्रेरणादायी ः भोसले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 31, 2021

शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास तरुणांसाठी प्रेरणादायी ः भोसले

 शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास तरुणांसाठी प्रेरणादायी ः भोसले

नगर जिल्हा विश्व हिंदु परिषद व बजरंगदल तर्फे शिवजयंती उत्सव साजरा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत.आज देशभर शिवजयंती सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते.स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्राच्या मनामनात अखंडतेची ज्योत पेटवली.महाराष्ट्रात ज्या लढाया झाल्या त्या शूर पराक्रमांची साक्ष आजही महाराष्ट्रातील गड,किल्ले देत आहेत.मूठभर मावळे असताना देखील महाराजांनी शत्रुसैन्याला धूळ चारली.तान्हाजी मालुसरे,बाजीप्रभू देशपांडे,शिवा काशीद,जिवा महाले,संताजी,धनाजी हे शूर सरदार श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारे आहेत.श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.असे प्रतिपादन विश्वहिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अँड.जय भोसले यांनी केले.                                      
  दिल्लीगेट येथील विश्वहिंदू परिषद कार्यालय,कुबेर गणेश मंदिर येथे नगर जिल्हा विश्व हिंदु परिषद व बजरंग दलाच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी विश्वहिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अँड.जय भोसले,जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे,मठ मंदिर समितीचे जिल्हा प्रमुख हरिभाऊ डोळसे,धर्मप्रसार प्रमुख अनिल देवराव,बजरंगदलाचे जिल्हा अध्यक्ष गौतम कराळे,प्रखण्ड मंत्री अनिल राऊत,शहर सहमंत्री श्रीकांत नांदुरकर, बाली जोशी,मुकुल गंधे,राजेंद्र चुंबळकर, मनोहर भाकरे, ललित गांधी,भागवत कुरुधने आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here