साई बाबांचा दर्शनपास बंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 15, 2021

साई बाबांचा दर्शनपास बंद

 साई बाबांचा दर्शनपास बंद

शिर्डी संस्थानचा महत्वाचा निर्णय


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः येत्या  काही दिवसात तुम्ही साईबाबांच्या दर्शनाला जाणार असाल, तर शिर्डी संस्थानाने सध्या घेतलेल्या निर्णयाविषयी तुम्हाला माहिती हवी.
शिर्डीतील साई शिर्डीतील साई मंदिरात दर्शनासाठी दररोज हजारो-लाखो भाविक येत असतात. शिर्डी संस्थान साईभक्तांच्या सोई-सुविधेसाठी प्रयत्नशील असते. भाविकांना कोणत्याही  तसदीविना साईदर्शन करता यावे यासाठी संस्थानाचा पुढाकार असतो. सध्या शिर्डीतील तापमानाचा विचार करता. शिर्डी साईबाबाबा संस्थानाने महत्वाचा निर्णय  घेतलाय. राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानवाढ सुरू आहे. शिर्डीतदेखील उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे शिर्डीत साईदर्शनाच्या शुल्क आणि मोफत दर्शन पासेसचं सकाळी 11 ते 4 दरम्यान वितरण बंद राहणार आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने साई भक्तांना सकाळी 6 ते 11 आणि सायंकाळी 4 ते 9:30 दरम्यान दर्शन पासेसचं वितरण केले जाणार आहे. पासेसच्या वितरण सुरू असताना साईभक्तांना दिवसभरातील कुठल्याही वेळेचा पास घेण्याची मुभा आहे.

No comments:

Post a Comment