वॉन्टेड आरोपी श्रीगोंद्यात अटक दोन खून व दरोड्यातील - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 15, 2021

वॉन्टेड आरोपी श्रीगोंद्यात अटक दोन खून व दरोड्यातील

 वॉन्टेड आरोपी श्रीगोंद्यात अटक दोन खून व दरोड्यातील


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः 1 वर्षांपूर्वी संगमनेर तालुक्यातील ‘हॉटेल प्राईड’ चे मालक आशिष चंद्रकांत कानडे. वय 39 वर्षे (रा.कळंब ता.आंबेगाव. जि. पुणे) यांचा खून करून 40,000 रु. रोख रक्कम चोरून नेणार्‍या आरोपी बंगड्या उबर्‍या काळे वय 35 वर्ष (रा.सुरेगाव ता. श्रीगोंदा) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने त्याचे घरी छापा टाकून अटक केली आहे. हा वॉन्टेड आरोपी कुणाच्या दोन गुन्ह्यात फरार होता. सुपा येथील एका गुन्ह्याचे प्रकरणात तो फरार असल्यामुळे त्यास सुपा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या घटनेबाबत फिर्यादी सुनिल बळीराम पवार, वय- 49 वर्षे, धंदा- वेटर, रा. सिंदखेडा, जि- धूळे यांनी घारगांव ता. संगमनेर पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्हा दाखल झाल्यनंतर या गुन्ह्यातील आरोपी मिथून उंबर्‍या काळे हा फरार झालेला होता. या फरार आरोपीचा शोध घेणेकामी पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे आदेशाने अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्वतंत्र पथकाची नेमणूक केली होती. त्याप्रमाणे पथकातील पोहेकॉ/दत्तात्रय हिंगडे, सुनिल चव्हाण, बबन मखरे, आण्णा पवार, जालिंदर माने, आकाश काळे, चालक संभाजी कोतकर असे फरार आरोपीचा शोध घेत असताना पोनि/अनिल कटके फरार आरोपी मिथून काळे सुरेगांव, ता- श्रीगोंदा येथे त्याचे घरी आला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी सुरेगांव येथे जावून आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती मिळाल्यावर सापळा लावून मिथून उंबर्‍या काळे, वय- 22 वर्षे, रा. सुरेगांव शिवार, ता- श्रीगोंदा यांस ताब्यात घेतले.
मिथून उंबर्‍या काळे याचे विरुध्द सुपा पो.स्टे. येथे दाखल असून या गुन्ह्यात फरार असल्याने त्यांस सुपा पो.स्टे. येथे हजर करण्यात आलेले आहे. पुढील कार्यवाही सुपा पो.स्टे. करीत आहे. अशा प्रकारे दोन खूनाचे गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपी जेरबंद करण्यात आलेला आहे. ही कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. सौरभ कुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. अजित पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग, अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment