अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या योजना ! 18 मार्चला स्थायी समिती सभा.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 15, 2021

अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या योजना ! 18 मार्चला स्थायी समिती सभा..

 अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या योजना !

18 मार्चला स्थायी समिती सभा..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः 2020-2021 सुधारित व 2020 2021चे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी गुरुवारी दि.17 मार्च रोजी स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे.
स्थायीचे सभापती अविनाश घुले यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर ही स्थायीची पहिलीच सभा होत असून सभेपुढे तयार करण्यात आलेला अर्थसंकल्प ठेवण्यात येणार असून, या अर्थसंकल्पात कोणत्या प्रश्नांसाठी किती निधी ठेवण्यात आला आहे. याची माहिती समिती सदस्यां पुढे मांडण्यात येणार असून अविनाश घुले यांनी सभापती पदावर निवड झाल्यावर सर्वांना बरोबर घेऊन मी काम करेल असे आश्वासन दिले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पात शहरातील कोणत्या प्रश्नांना महत्त्व दिले जाते हे समजणार आहे.

No comments:

Post a Comment