महावीर इन्टरनेशनल आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी आयपीएस शांतीकुमार जैन यांची फेरनिवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 17, 2021

महावीर इन्टरनेशनल आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी आयपीएस शांतीकुमार जैन यांची फेरनिवड

 महावीर इन्टरनेशनल आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी आयपीएस शांतीकुमार जैन यांची फेरनिवड


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः देश-विदेशात गत 46 वर्षे, 350 हून अधिक प्रमुख केंद्राव्दारे हजारो सदस्यांच्या माध्यमातून सामाजिक सेवाभावी कार्य करणार्‍या महावीर इन्टरनेशनल या अग्रगण्य(अ‍ॅपेक्स) संस्थेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी दिल्ली येथील सुविख्यात प्रशासकीय निवृत आयपीएस अधिकारी श्री.शांतीकुमारजी जैन यांची फेरनिवड झाली त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. श्री.एस के जैन हे आयपीएस असुन त्यांनी मुंबई-दिल्ली व अनेक शहरात पोलिस आयुक्त म्हणुन काम केले.
माजी पंतप्रधान व अनेक मातबर नेत्यांचे संरक्षणाची जबाबदारी श्री.जैन यांनी सांभाळली. अत्यंत शिस्तप्रिय पण मनमिळाऊ अधिकारी म्हणुन त्यांनी गत दोन वर्षे महावीर इंटरनेशनल अध्यक्ष म्हणुन त्यांनी महत्वाचे कार्य केले. कोरोनाच्या या वर्षभरात त्यांनी संस्थेच्या माध्यमातुन पिडीत गरजुंना मोठी मदत केली. म्हणुन कोरोनायोध्दा पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला. अशा प्रभावी व्यक्तिमत्वाची फेरनिवड झाल्याबद्दल राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेशचंद्र बाफना, गौतमलाल बरमेचा,नरेंद्र बाफना व वीर-वीरा पदाधिकारी सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. अहमदनगर औरंगाबाद प्रभागातून श्री जैन यांना 100% टक्के मतदान झाले.झोन सचिव सतिष चोपडा व धनराजसंचेती यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here