सावेडीतील मनपाचे कोविड लसीकरण केंद्र दुसर्‍या मजल्यावर असल्याने ज्येष्ठांचे हाल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 17, 2021

सावेडीतील मनपाचे कोविड लसीकरण केंद्र दुसर्‍या मजल्यावर असल्याने ज्येष्ठांचे हाल

 सावेडीतील मनपाचे कोविड लसीकरण केंद्र दुसर्‍या मजल्यावर असल्याने ज्येष्ठांचे हाल

मनपा आरोग्य केंद्राचा चव्हाट्यावर : अजिक्य बोरकर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. केंद्र सरकारने 60 वर्षापुढील नागरिकांना कोविड-19 लसीकरणाची सुरुवात केली आहे.
सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकातील मनपा सावेडी कार्यालया शेजारी आरोग्य विभागात दुसरा मजल्यावर लस देण्याचे काम सुरु झाले आहे. परंतु ज्येष्ठ नागरिकांना वर लस घेण्यासाठी जाणे शक्य होत नाही. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी सुविधा नाही. पिण्याचे पाणी नाही. याचबरोबर 80 ते 90 वर्षातील नागरिकांन पायर्‍या चढणे शक्य होत नसल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक लसीपासून वंचित राहत आहे. लस घेण्याविनाच घरी जावे लागत आहे. कोरोनाचा भयंकर संकट असताना ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही. आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याशी संपर्क केला असता सकारात्मक दृष्टिकोनातून विचार न करता वरील लसी केंद्र बंद करण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या प्रोफेसर कॉलनी चौकात जागा असतानाही तिसर्‍या मजल्यावर लसीकरण केंद्र सुरु आहे. शेजारीच प्रमोदजी महाजन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची जागाही उपलब्ध आहे. परंतु मनपा आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा व नियोजनबद्ध नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कोरोना काळामध्ये विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे, या प्रकारची माहिती आयुक्त शंकर गोरे यांना फोनवरून दिले असून ते आरोग्य केंद्रास भेट देऊन पुढील उपाययोजना तत्काळ करण्यात येईल, अशी माहिती माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment