नर्मदेच्या तिर्थस्थळांनी भक्तीच्या साधनेला बळ मिळते : शिवाजीराव कर्डिले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 17, 2021

नर्मदेच्या तिर्थस्थळांनी भक्तीच्या साधनेला बळ मिळते : शिवाजीराव कर्डिले

 नर्मदेच्या तिर्थस्थळांनी भक्तीच्या साधनेला बळ मिळते : शिवाजीराव कर्डिले

बुर्‍हाणनगर येथील सुदाम कर्डिले व भाऊसाहेब धाडगे यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
आई जगदंबेचे ठाणे म्हणून ओळखले जाणारे बुर्‍हाणनगर हे शक्तीपिठाची पुरातण वारसा असलेले गाव. शेतकरी कुटुंबातील सुदाम महाराज कर्डिले व भाऊसाहेब (तबाजी) धाडगे यांनी शेतीच्या कष्टाबरोबर भक्तीचा वारसा जोपासला. भक्तीची ओढ त्यांना नर्मदा परिक्रमाची प्रेरणा देऊन गेली. भारतातील नद्यांमध्ये नर्मदेचे स्थान महत्त्वाचे आहे. ही नदी मध्यप्रदेशातून अमरकंठ येथून गुजरात-महाराष्ट्र सीमेमधून पश्चिमार्गेतून अरबी सागरात मिळते. या नर्मदा नदीच्या पाण्याने तिन्ही राज्यातील शेतीला संजीवनी मिळाली. त्याचबरोबर नर्मदेच्या तिरावर असलेल्या तिर्थस्थळांनी भक्तीची साधनेला बळ दिले. नर्मदेच्या पात्रातील कंकर कंकर शंकर हे अशी मान्यता आहे. ओंकारेश्वर सारखे जगप्रसिद्ध शिवालय नर्मदेच्या तिरावर आहे. नर्मदा परिक्रमेची परंपरा पुरातन असून त्याला अध्यात्मिक महत्त्व आहे. ओंकारेश्वर येथून सुरू होऊन पुन्हा अमरकंठमार्गे पुन्ह ओंकारेश्वर येथे समाप्त होणारी ही परिक्रमा खडतर असून या परिक्रमेला सुमारे 4 महिने लागतात. ही परिक्रमा पूर्ण करीत असताना डोंगर दर्‍या, अरण्य यातून हा मार्ग जातो, अशी माहिती माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले.
बुर्‍हाणनगर येथील शेतकरी सुदाम महाराज कर्डिले व भाऊसाहेब (तबाजी) धाडगे यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल बुर्‍हाणनगर ग्रामस्थांनी त्यांची भक्तीमय वातावरणात मिरवणूक काढली. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, जयराम कर्डिले, आनंदा कर्डिले, दगडू पानसरे, सरपंच रावसाहेब कर्डिले, जालिंदर जाधव, विष्णू कर्डिले, रभाजी कर्डिले, झुंबर झांजे, अण्णा कचरे, दत्ता तापकिरे, रवी कर्डिले, अमोल धाडगे, किशोर कर्डिले, तात्या कर्डिले, नंदू कर्डिले, दत्ता दळवी, हरिभाऊ खर्से, रंगनाथ कर्डिले, गोवर्धन मोरे, राजू फसाटे, किरण दाभाडे, सुनील कदम, नवनाथ वाघ, बापू कुलट आदींसह सर्व भजनी मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
सुदाम महाराज कर्डिले म्हणाले की, नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याची इच्छा अनेक वर्षांपासून होती. ती आम्ही दोघांनी पूर्ण केली. या माध्यमातून भक्तीचा आनंद मिळाला. तसेच गावातील सर्व मंदिरांतील देवांना नर्मदा नदीचे पाणी वाहण्यात आले, असे ते म्हणाले. भाऊसाहेब धाडगे म्हणाले की, नर्मदा नदीच्या परिक्रमेतून पुण्य लाभते. या परिक्रमेतून आजच्या युवकांना भक्तीची प्रेरणा मिळते. आम्ही ही परिक्रमा पूर्ण करुन 4 महिन्यानंतर गावात आल्यानंतर ग्रामस्थांनी आमचे मोठ्या उत्साहात स्वागत करुन भक्तीभावाच्या, टाळ पखवादाच्या गजरात मिरवणूक काढली. हे पाहून आम्ही भारावून गेलो, असे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here