राहुरी नगरपालिकेने छत्रपती चौक नावाची दप्तरी नोंद करावी ः लांबे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 17, 2021

राहुरी नगरपालिकेने छत्रपती चौक नावाची दप्तरी नोंद करावी ः लांबे

 राहुरी नगरपालिकेने छत्रपती चौक नावाची दप्तरी नोंद करावी ः लांबे

रस्ता दुभाजक करण्यास व्यापार्‍यांचा विरोध

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः राहुरी नगरपालिकेच्या वतीने अग्निशमन दल इमारत  ते डॉ.खुरुद दवाखाना पर्यंत रस्ता दुभाजकाचे काम करण्यात येणार आहे, या होणार्या रस्ता दुभाजकाच्या कामाला येथिल व्यापार्यांनी विरोध दर्शविला आहे.तसेच कॉलेज रोड,ब्लड बँक चौकाला छत्रपती चौक हे नाव देण्यात आलेले आहे.या नावाची राहुरी नगरपालिकेने छत्रपती चौक या नावाची दप्तरी नोंद लावावी व अन्यकोणतेही नाव या चौकाला देवू नये अशा आशयाचे निवेदन नगरपालिकेला देण्यात आले.
या प्रसंगी व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष प्रकाश पारख,मराठा बहूउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा मराठा क्रांति मोर्चाचे जिल्हा समन्वयक देवेंद्र लांबे पाटील,विजय कोहकडे,सुभाष पवार आदी उपस्थित होते.  
निवेदनात म्हंटले आहे की, अग्निशमन दल इमारत  ते डॉ.खुरुद दवाखाना पर्यंत रस्त्याला गिरगुणे हॉस्पिटल,ढुस हॉस्पिटल,खुरुद हॉस्पिटल त्याच प्रमाणे काही औषधी एजन्सिज तथा काही खाद्य वस्तूंच्या व्यावसायिकांचे दुकाने आहेत.या सर्व व्यवसायिकांकडे मोठी साधने माल उतरविण्यासाठी किंवा माल नेण्यासाठी छोटी वाहने येत असतात. तसेच मोठमोठी हॉस्पिटल देखील याच परिसरात आहेत.
रस्ता दुभाजक टाकल्यामुळे रहदारीला अडचण होऊन भविष्यकाळात वाहनांच्या गर्दीची समस्या निर्माण होणार आहे.या सर्व कारणाने आपण या रस्त्यावर दुभाजक टाकू नये अशी विनंती सर्व व्यापर्यांच्या वतीने करण्यात येत आहे.सदर या चौकाचा नावा संदर्भात मा.नगराध्यक्ष तथानामदार श्री.प्राजक्त दादा तनपुरे साहेब यांचा समक्ष दिड वर्षांपूर्वी संबंधित चौकाचा नावाविषयी तोंडी चर्चा करण्यात आली होती संबंधित चौकाच्या नावाविषयी तोडगा काढण्याचे आश्वासन नामदार श्री.प्राजक्त दादा तनपुरे साहेब यांनी दिले होते. तरी मुख्याधिकारी साहेब यांनी वर नमुद केलेल्या चौकाची  छत्रपती चौक  अशी दफ्तरी नोंद करून भविष्यकाळात दुसरे कोणतेही नाव देवून शिवशंभु प्रेमीच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची नोंद घेण्याचे अवाहन मराठा बहूउद्देशीय संस्था संचालित मराठा एकीकरण समिती राहुरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
निवेदनावर भैय्यासाहेब शेळके,प्रभाकर ठोकळे,अरुण ताकटे,विलास धसाळ,प्रशांत हरिषचंद्रे,राहुल वाघमारे,शिंदे अविनाश,रावसाहेब दातिर,अनिल क्षीरसागर,सागर ताकटे,धनंजय नरवडे,रामदास कटारे,भारत टेमक, मधुकर घाडगे,सोमनाथ धुमाळ,महेश नेहे आदी व्यापारी व शिवशंभू प्रेमी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here