कुंभार समाजातील वीटभट्ट्यांवर कारवाई करुन महसुल विभागाची पठाणी वसुली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 17, 2021

कुंभार समाजातील वीटभट्ट्यांवर कारवाई करुन महसुल विभागाची पठाणी वसुली

 कुंभार समाजातील वीटभट्ट्यांवर कारवाई करुन महसुल विभागाची पठाणी वसुली

अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे गौण खनिज शाखेत निवेदन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यात कुंभार समाजातील वीटभट्टयांवर चुकीच्या पध्दतीने सुरु असलेली दंडात्मक कारवाई त्वरीत थांबविण्याची मागणी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथील गौण खनिज शाखेत निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हा खनिकर्म अधिकारी वसीम सय्यद यांना देण्यात आले. यावेळी   कुंभार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.राजेंद्र बोरुडे, अखिल महाराष्ट्र कुंभार समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष नितीन घोडके, मातीकला सेलचे राज्य सचिव विवेक जगदाळे आदीसह जिल्ह्यातील सर्व कुंभार समाजातील वीटभट्टी चालक उपस्थित होते.    
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयातील महसूल कर्मचारी कुंभार समातील वीटभट्टी व्यावसायिकाकडून 1 हजार ब्रास माती रॉयलटीचे (दंड) प्रत्येकी 1 लाख 60 हजार रुपये भरून घेण्यासाठी जबरदस्तीने पठाणी वसुली करत आहे. कुंभार समाजाला पाचशे ब्रास रॉयल्टी शासनाकडून माफ असून, त्यापुढे माती आढळ्यास दंडात्मक कारवाई करता येते. मात्र महसूल कर्मचारी सरसकट सर्वांवर दंडात्मक कारवाई करीत आहे. कुंभार समातील वीटभट्टी व्यावसायिकाकडे किती माती आहे? याची मोजणी देखील केली जात नाही. जे वीटभट्टी व्यवसायिक पैसे भरत नाही, त्यांच्या जमिनीवर बोजा चढवण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. शासनाच्या नियमानुसार शासकीय जागेतून नदी-नाले बंधारे यातून प्राधान्याने माती उपलब्ध करून देण्याचे महसूल कर्मचारी यांना आदेश दिलेले असताना, महसूल कर्मचारी यांच्याकडून या प्रकारची कुठलीही मदत दिली जात नाही.  जिल्ह्यातील कुंभार समाज वीटभट्टी व्यावसायिक खाजगी जमीन मालकीच्या संमतीने त्यांच्या जमिनीच्या वरील भागाचा नापीक झालेला मातीचा थर स्वखर्चाने उत्खनन व वाहतूक करून या मातीपासून वीटभट्टी व्यवसाय करत आहे. तरी देखील त्यांना सरसकट प्रत्येकी 1 लाख 60 हजार रुपये जबरदस्तीने दंडात्मक कारवाईच्या नावाखाली पठाणी वसुली केली जात आहे. पारनेर तालुक्यात तहसिलदारांनी कुंभार समाजातील वीटभट्टी चालकांकडून कोरे चेकवर सही करुन ताब्यात घेतले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. सदरील कुंभार समाजातील वीटभट्टयांवर चुकीच्या पध्दतीने सुरु असलेली दंडात्मक कारवाई त्वरीत थांबविण्याची मागणी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here