तांभेरे ते गुहा पुलाच्या पुर्नबांधणीसाठी निधी मंजूर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 17, 2021

तांभेरे ते गुहा पुलाच्या पुर्नबांधणीसाठी निधी मंजूर

 तांभेरे ते गुहा पुलाच्या पुर्नबांधणीसाठी निधी मंजूर

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः राहुरी तालुक्याला थेट संगमनेरला जोडणार्‍या गुहा- शिबलापूर रस्त्यावरील तांभेरे ते गुहा येथे पुलाच्या पुनःबाँधणीसाठी 1 कोटी 41 लाख 9 5 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्याचे नगरविकास तथा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
राहुरी , नगर व पाथर्डी मतदार संघामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित कामांकडे लक्ष दिले गेले नाही . राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आणून कोट्यवधी रूपयांची विकासकामे सुरू केली आहेत . तीनही तालुक्यांमध्ये रस्त्यांच्या कामांना कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे . याप्रमाणेच संगमनेर , शिबलापूर , तांभेरे , गुहा , देवळाली प्रवरा , टाकळीमिया , तिळापूर या रस्त्यावर शेकडो वाहने दैनंदिन ये जा करतात . परंतु या रस्त्यावरील गुहा ते तांभेरे परिसरात असलेल्या पुलाची अवस्था बिकट झाली होती.
संगमनेर व राहुरीला जोडणार्‍या या रस्त्यावरील प्रवाशांची होणारी ससेहोलपट पाहता राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पुलाच्या बांधकामासाठी 1 कोटी 41 लाख 9 5 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे . महाराष्ट्र शासन नाबार्ड 25 अंतर्गत हा निधी उपलब्ध झाला असून , या रस्त्याने प्रवास करणारे शेतकरी , विद्यार्थी व लगतच्या ग्रामस्थांना मोठा दिलासा लाभणार आहे . गत 15 वर्षांपासून पावसाळ्यातील पाण्यामुळे या पूल व रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती , यापुढेही निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन राज्यमंत्री तनपुरे यांनी दिले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here