राहुरी तालुक्यात भीम आर्मीच्या 12 शाखांचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 17, 2021

राहुरी तालुक्यात भीम आर्मीच्या 12 शाखांचा शुभारंभ

 राहुरी तालुक्यात भीम आर्मीच्या 12 शाखांचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः बहुजन नायक कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त भीम आर्मीचे संस्थापक अ‍ॅड. चंद्रशेखरजी आझाद रावण यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी तालुक्यात भीम आर्मीच्या 12 शाखांचा शुभारंभ करण्यात आल्या असल्याची माहिती भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष श्री. तानसेनभाई बिवाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महाराज्य प्रमुख प्रफुल्लजीभाई शेंडे, राज्यप्रमुख संघटक दिपकभाऊ भालेराव, पापाभाई बिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील देवळाली प्रवरा, गुहा, जेऊरवाडी, पिंपळगाव, संक्रापूर, मोमीन आखाडा, उंबरे, वांबोरी, राहुरी, डिग्रस, राहुरी खुर्द येथे शाखांचा शुभारंभ करण्यात आला. प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष सतीश चक्रे, तालुकाध्यक्ष सनी काकडे, तालुका प्रभारी गुलशनभाई बिवाल, जिल्हा संघटक मनोज शिरसाठ, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा शालिनीताई पंडीत, जिल्हा कार्याध्यक्ष मुन्नाभाई चावरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ऋषी पोळ आदींसह भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment