गावकारभार्‍यांनो, आता अपेक्षा ग्रामविकासाची ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 19, 2021

गावकारभार्‍यांनो, आता अपेक्षा ग्रामविकासाची !

 गावकारभार्‍यांनो, आता अपेक्षा ग्रामविकासाची !

(सत्तेची घमेंड नको, जनतेला हवा विकास)


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः दरवर्षी निवडणुका चालूच असतात ग्रामपंचायती झाले की पंचायत समिती, जिल्हा परिषद,आमदारकी, खाजदारकी, संस्था सोसायटी या निवडणुका होत असतात निवडणूका संपले की हेवेदावे विसरून गावातील लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. गावच्या विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. परस्पर सहकार्याचे आणि संस्कृती चे विकास व्हायला हवा तरच ग्राम विकास होईल राजकारण म्हणजे कोणाची कोणाशी स्पर्धा नव्हे निवडणूक ही लोकशाहीचा अविभाज्य घटक आहे.
स्वातंत्र्यानंतर लोकशाही स्वीकारले असून आपण ज्या विभागात राहतो त्या विभागाचा विकास करुन घेणारी व्यवस्था निर्माण करण्यासाठी सार्वत्रिक निवडणुका लोकांच्या माध्यमातून घेतल्या जातात व लोकांच्या माध्यमातून एक उमेदवार निवडून दिला जातो जनता त्याला स्वीकारेल तो प्रतिनिधी बनतो. खचुन प्रयत्न न सोडता पुढील निवडणुकीसाठी जोमाने काम करणे गरजेचे आहे. निवडणुकीचे वारे तत्कालीन असुन संघर्षशील असले पाहिजे. मात्र निवडणुका झाल्या की त्या विषयाला कलाटणी देऊन सर्व हेवेदावे विसरून गावातल्या लोकांनी एकत्र यायला हवे गावच्या विकासासाठी प्रयत्न करायला हवे परस्पर सहकार्याची अशी  नवीन संस्कृती यु कशी होईल निवडणूक आपापसात लढते होणारच चांगला आणि आदर्श दृढ गाव गाडा चालवण्यासाठी हे अपेक्षित आहे.
जो निकाल लागला तो त्या जन मताचा आदर केला पाहिजे राजकारण बाजूला ठेवून पाच वर्षे एकत्र येऊन ग्राम विकास केला केला पाहिजे. निवडणूक निवडून आलेले प्रतिनिधी यांनी विकासाला चालना देत प्रगतशील आलेख उंचावला पाहिजे मात्र निवडणुकीत पराभुत झालेले उमेदवार विकासाला अडसर आणतात यातून ग्राम विकास खुंट नारा असतो हे लक्षात घेतले पाहिजे. मात्र विजय उमेदवारांनी ही सत्तेची  घमेंट नसावी आपल्या हातात सत्ता दिलेली असते बदलाचे वारे आपण आहात हे विसरून चालणार नाही ग्रामसभेत झालेला ठराव हा शक्तिशाली समजला जातो ग्रामपंचायतीकडे ग्राम संसद म्हणून पाहिले जाते.
मतदाराला गुलाम करून ठेवणारे पद्धत पुन्हा या देशात रुजत आहे मतदार म्हणजे आपल्या घरचा गडी असल्यासारखा त्याचा वापर केला जातो आणि जनताही इतका लाचार नसावी की कोणतेही आपला वापर करावा.  ग्रामपंचायतीमध्ये नवे चेहरे आले आहेत त्या सर्वांकडून गावासाठी अनेक अपेक्षा आहेत प्रत्येकाने नवीन उंची गाठून विकासात्मक मुद्द्यावर सदैव कार्यरत असले पाहिजे असे प्रत्येक मतदारांची अपेक्षा असते आता या नवीन मंडळींनी अत्यंत चोख पणे गावच्या विकासाचा गाडा चालवला पाहिजे आपापसातले मतभेद बाजूला ठेवून एक मताने जनतेने आपल्या पदरात जो कौल दिला आहे त्यासाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे पुढील काळात जनसामान्यांची गोरगरिबांची कामे केली पाहिजे सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रित काम केलं पाहिजे .अशा या गुंडेगाव ग्रामपंचायतचा कारभार विकासंशिल होईल हीच अपेक्षा व्यक्त करून सुंदर असा विकासाचा गाडा हाकावा हेच गुंडेगाव जनतेचे माफक अपेक्षा...

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here