प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनाला यश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 19, 2021

प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनाला यश

 प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनाला यश


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव, भानगाव शिव रस्त्याच्या कामासाठी प्रहार जनशक्ती पक्ष्याचे राज्य प्रवक्ते संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा तालुक्यातील प्रहारचे पदाधिकारी आणि प्रहारचे मीडिया तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड यांनी वेळोवेळी आंदोलने व पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने यात शेवटी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष राज्यमंत्री बच्चू कडू यांनी श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीप पवार यांना फोन करत शिवरस्त्याच्या कामासाठी दखल घेण्यास सांगितले.
त्यानुसार तहसीलदार प्रदीप पवार यांनी आदेश देत स्वतः लक्ष घालून दोन दिवसांत शिवरस्त्याचे काम पूर्ण करून दिले. या कामी संतोष पवार प्रवक्ते प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य, विनोद परदेशी जिल्हाध्यक्ष, नयन पुजारी रुग्णसेवक महाराष्ट्र राज्य, अनिकेत कदम,अमोल मानकर रुग्णसेवक पुणे, अजित धस कार्याध्यक्ष अहमदनगर, प्रकाश बेरड जिल्हा सचिव, इंद्रजीत काळे युवा जिल्हाध्यक्ष, कृष्णा खामकर तालुका अध्यक्ष श्रीगोंदा, माधवभाऊ बनसुडे शहराध्यक्ष श्रीगोंदा, विजय शेंडगे तालुका उपाध्यक्ष, रसिक गुंदेचा समाजसेवक, बाळासाहेब गुंदेचा, नंदकिशोर कांबळे, अमोल कांबळे, अशोक नवले सरपंच भानगाव, तसेच परिसरातील शेतकरी आणि प्रहारचे पदाधिकारी यांचा सहयोग लाभला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here