वार्षिक एनसीसी शिबिरात छात्रसैनिकांनी घेतली बेटी बचाव-बेटी पढाव व स्त्रीजन्म स्वागताची शपथ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 1, 2021

वार्षिक एनसीसी शिबिरात छात्रसैनिकांनी घेतली बेटी बचाव-बेटी पढाव व स्त्रीजन्म स्वागताची शपथ

 वार्षिक एनसीसी शिबिरात छात्रसैनिकांनी घेतली बेटी बचाव-बेटी पढाव व स्त्रीजन्म स्वागताची शपथ


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर कॉलेजच्या एनसीसी मैदानावर सुरु असलेल्या एकत्रित वार्षिक एनसीसी शिबिरात डॉ.सुधा कांकरिया यांनी सहभागी छात्र सैनिकांना दिली स्त्रीजामांच्या स्वागताची शपथ . या अध्यक्षस्थानी कमांडींग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे समवेत अ‍ॅडमेनिस्ट्रेटीव ऑफिसर विनय बाली उपस्थित होते. लेफ्टनंट डॉ.एम एस जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले तसेच एनसीसीची भुमिका मांडत प्रमुख वक्त्या डॉ. सुधा कांकरिया यांची ओळख करून दिली. सदर प्रसंगी बेटी बचाओ चळवळीमध्ये 35 वर्षे योगदान देणार्या डॉ. सुधा कांकरिया यांचा कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे यांच्या हस्ते मोमेंटो देऊन सन्मान करण्यात आला.
डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या कि स्त्री एक पणती आहे व ती या कलयुगाच्या वादळवार्यात विझू पहात आहे. तिचे संरक्षण करण्यासाठी दोन हातांची गरज आहे. एक हात हवा आहे समाजाच्या सकारात्मक बदलाचा आणि दुसरा हात कायद्याच्या कडक व ताबडतोब अंमलबजावणीचा. खरं तर आपण आपल्या भारत देशाला माता म्हणून संबोधतो. आपली भारतीय संस्कृतीही जगात उच्च संस्कृती समजली जाते. सत्य, अहिंसा ही गुणतत्वे भारतीय संस्कृती कडून जगाला मिळाली आहेत परंतू भारतात व चीनमध्ये स्त्रीभ्रुणहत्येचे प्रमाण अधिक आहे. हा विरोधाभास आहे. गेल्या 35 वर्षापासून स्त्री जन्माचे स्वागत करा, बेटी बचाओ द्वारा राबविले गेलेल्या 11 कलमी कृती कार्यक्रमाची माहिती त्यांनी दिली. डॉ. सुधा कांकरिया पुढे युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती असते व परिवर्तन करण्याची क्षमता युवापिढीमध्येच असते. म्हणूनच एनसीसी परिवाराकडून आशा आहे त्यांनी जर ठरवलं तर उभ्या देशात परिवर्तन होईल. एकता व शिस्त हे दोन महत्वाचे पैलू एनसीसी कडे आहेत असेही त्या म्हणाल्या. सदर प्रसंगी डॉ. सुधा कांकरियांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सहभागी सर्वांनी ‘बेटी बचाओ’ विषयी ठराव पास केला व स्त्रीजन्माच्या स्वागताची शपथ घेतली.
अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर जे बर्नबस यांना महाविद्यालयात होत असलेल्या  या प्रकारची  माहिती दिली असता त्यांनी या उपक्रमचे कौतुक करत या विषयासंबंधी समाजात जागृतीची गरज आहे असे मत वेक्त करत व छात्र सैनिकांना शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment