आयुष्यात एकदा तरी रविदास धामांची यात्रा आवश्य करावी ः बुंदेले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 1, 2021

आयुष्यात एकदा तरी रविदास धामांची यात्रा आवश्य करावी ः बुंदेले

 आयुष्यात एकदा तरी रविदास धामांची यात्रा आवश्य करावी ः बुंदेले

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संत रविदास महाराजांची जयंती साजरी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जिथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचे जन्म झाले ते सीरगोवर्धनपूर (काशी), सचखंड बल्ला डेरा (पंजाब) येथील द्वितीय धाम आणि कोथरूड (पुणे) येथील तृतिय धामांची आयुष्यात एकदा आवश्य यात्रा करावी. ज्यामुळे रविदास महाराजांचे विचार व कार्य समाजाला कळेल. कोणताही जातीभेद न पाळता, सर्वांना समानता, बंधुत्वाची शिकवण देणारे ते महान संत होते. समाजातील अंधश्रध्दा दूर करण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बुंदेले यांनी दिले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जिल्हा संपर्क कार्यालयात संत रविदास महाराजांची 644 वी जयंती साजरी करण्यात आली. कोरोनाचे प्रादुर्भाव लक्षात घेऊन साध्या पध्दतीने नियमांचे पालन करुन ही जयंती साजरी झाली. प्रारंभी रविदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी महासंघाचे जिल्हा सचिव बापूसाहेब देवरे, खजिनदार संभाजी आहेर, जिल्हा सदस्य प्रकाश सोनवणे, विठ्ठलजी जयकर आदी उपस्थित होते.
युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे यांनी रविदास महाराजांच्या कार्याचे वर्णन केले. जिल्हा प्रवक्ते विशाल बेलपवार यांनी प्रास्ताविक केले. आभार शहर जिल्हाध्यक्ष संतोष उदमले यांनी मानले. याप्रसंगी बापूसाहेब देवरे, संभाजी आहेर, प्रकाश सोनवणे, विठ्ठल जयकर, बाळासाहेब केदारे, विशाल बेलपवार, संतोष उदमले, विकी गारदे, महेश आहेर, अभिनव सूर्यवंशी, चिनूलाल बुंदेले, दुर्वश शेलार, आनंद बुंदेले, खेमराजबुंदेले आदी पदाधिकारी आणि समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here