ग्राम बालसंरक्षण समिती प्रशिक्षण कार्यशाळेत बालकांचे हक्क व त्याच्या संरक्षणाची जागृती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 22, 2021

ग्राम बालसंरक्षण समिती प्रशिक्षण कार्यशाळेत बालकांचे हक्क व त्याच्या संरक्षणाची जागृती

 ग्राम बालसंरक्षण समिती प्रशिक्षण कार्यशाळेत बालकांचे हक्क व त्याच्या संरक्षणाची जागृती


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शेवगाव व पाथर्डी येथे ग्राम बाल संरक्षण समिती प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय कदम, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.जी. पाटील, परिविक्षा अधिकारी एस.ए. राशिनकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गट विकास अधिकारी शीतल खिडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी (शेवगाव) एस.एस. ढाकणे, महेंद्र दराडे, तालुका संरक्षण अधिकारी सचिन जाधव व गोवर्धन वीर यांच्या उपस्थितीत ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका आणि पोलिस पाटील यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.                              
प्रशिक्षण दोन सत्रामध्ये कोरोनाच्या नियमाचे पालन करून घेण्यात आले. या कार्यशाळेत सचिन जाधव, सर्जेराव शिरसाठ, प्रकाश वाघ, बाळु साळवे, श्रद्धा मुसळे, रूपाली व्हावळ तसेच सर्व सुपरवायझर यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला. प्रास्ताविकात श्रद्धा मुसळे यांनी कार्यशाळेची भूमिका स्पष्ट केली. या कार्यशाळेत बालकामगारांना शिक्षण मिळण्यासाठी, बालविवाह व बाल लैंगिक प्रतिबंध कायद्याची माहिती देण्यात आली. यावेळी चाईल्ड लाइन सदस्यांनी बालकांचे हक्क व संरक्षण विषया संदर्भात मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment