नगर जिल्हा रजिस्टार संघटनेच्यावतीने कानडे यांचा सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 22, 2021

नगर जिल्हा रजिस्टार संघटनेच्यावतीने कानडे यांचा सन्मान

 नगर जिल्हा रजिस्टार संघटनेच्यावतीने कानडे यांचा सन्मान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी संतोष कानडे यांना नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गुणवंत सेवक 2021 पुरस्कार मिळाल्याबद्दल नगर जिल्हा रजिस्टार संघटनेच्या वतीने त्याचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. पेमराज सारडा महाविद्यालयात संघटनेचे प्रमुख सल्लागार अशोक असेरी यांनी संतोष कानडे यांचा सत्कार केला. यावेळी न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे रजिस्टार शिवाजीराव साबळे, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरुण बळीद, अहमदनगर कॉलेजचे रजिस्टार दीपक आल्हाट आदी उपस्थित होते.
अशोक असेरी म्हणाले, महाविद्यालयाच्या कामकाजात शिक्षकांप्रमाणे शिक्षकेतर कार्माचारींचेही भरीव योगदान असते. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचारी हा महाविद्यालयातील प्रमुख घटक आहे. न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी संतोष कानडे यांच्या महाविद्यालयातील चांगल्या कामाची दखल सावित्रीबाई फुले पुणे विद्यालयाने घेत दिलेला पुरस्कार नगर जिल्हा रजिस्टार संघटनेला अभिमानास्पद आहे.
शिवाजीराव साबळे म्हणाले, शिक्षाकांप्रमाणेच शिक्षकेतर कर्मचारी घटकही महाविद्यालयाच्या दैनंदिन कामकाजात सहभगी होत सर्वांना मदत करत असतो. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या कामाची दाखल घेत राज्य शासनाने आदर्श शिक्षका प्रमाणे आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार देण्यास सुरवात करावी, अशी मागणी केली.
सत्कारास उत्तर देताना संतोष कानडे म्हणाले, महाविद्यालयात काम करतांना सुरवाती पासूनच मिळालेल्या सर्व जवाबदार्‍या प्रामाणिकपणे पार पडल्या. सर्वांच्या सहकार्याने शैक्षणिक कामां बरोबरच सामाजिक क्षेत्रातही काम करू शकलो. या कामांची दखल घेऊन मला हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. नगर जिल्हा रजिस्टार संघटनेने केलेला सत्कार हा प्रेरणा देणारा आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here