सदृढ शरीर हीच खरी संपत्ती ः कर्डिले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 18, 2021

सदृढ शरीर हीच खरी संपत्ती ः कर्डिले

 सदृढ शरीर हीच खरी संपत्ती ः कर्डिले

निंबोडी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जय मल्हार कुस्ती संकुलाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः जय मल्हार कुस्ती संकुल जिल्ह्याच्या दृष्टीने दखल घेण्यासारखे ठरले आहे. इतर खेळांच्या तुलनेत कुस्ती हा खेळ मागे पडत चालला आहे. निरोगी आरोग्य व शरीर सदृढतेसाठी कुस्ती हा खेळ महत्त्वाचा आहे. शरीर संपदाच कुस्ती मल्लाची ओळख ठरते. पैलवानाल पैलवान असल्याचे सांगावे लागत नाही. कोरोनात सर्वांना आरोग्याचे महत्त्व पटले असून, सदृढ शरीर हीच खरी संपत्ती असल्याची भावना माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केली.
    निंबोडी (ता. नगर) येथे उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे जय मल्हार कुस्ती संकुलाचा शुभारंभ माजी मंत्री कर्डिले व माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी कर्डिले बोलत होते. तसेच कुस्ती मल्लांच्या वसतीगृहाचे उद्घाटन मनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, प्रविण कोकाटे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, उपमहाराष्ट्र केसरी सचिन यलभर, भाजपचे नगर तालुकाध्यक्ष सरपंच मनोज कोकाटे, दरेवाडी सरपंच अनिल करांडे, निंबोडीचे सरपंच शंकरराव बेरड, संचालक पै.भाऊसाहेब धावडे, भगवानराव भोगाडे, वस्ताद गेणुभाऊ यलभर, काळूराम गवारे, अकोळनेरचे सरपंच अनिल मेहेत्रे, नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, प्रहार संघटनेचे विनोदसिंग परदेशी, प्रकाश पोटे, नगरसेवक आसिफ सुलतान, डॉ.इमरान शेख, नफिस चुडीवाले, समीर खान, श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती शंकरराव पाडळे,  पै.संदीप यलभर, राजापूरचे सरपंच मांडगे, माजी सरपंच कुशाबा धावडे, आप्पा पारचणे, उपसरपंच रामभाऊ शेंडगे आदींसह निंबोडी व राजापूर (ता.श्रीगोंदा) येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
    पुढे बोलताना माजी मंत्री कर्डिले म्हणाले की, युवा पिढी व्यसनाच्या आहारी जात असताना, व्यायामाने निरोगी शरीर कमवता येणार आहे. मुलांबरोबर मुलींसाठी देखील कुस्ती संकुलात सोय करण्यात आल्याचे त्यांनी कौतुक केले. तर निबोंडी या छोट्याश्या गावात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुलाने भारावलो असल्याचे सांगून, शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
    प्रास्ताविकात पै.भाऊसाहेब धावडे म्हणाले की, खेळाला प्रोत्साहन व राजाश्रयाची गरज आहे. ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मल्ल घडविण्यासाठी या कुस्ती संकुलाची उभारणी करण्यात आली आहे. हे संकुल फक्त कुस्तीसाठी न राहता पोलीस, लष्कर भरती व स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्या युवकांसाठी देखील व्यायाम व सरावासाठी उपयोगी ठरणार आहे. भावी पिढी व्यसनमुक्त सदृढ व निरोगी राहण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. या कुस्ती संकुलात अद्यावत व्यायामाचे साहित्य असून, योग व प्राणायामचे देखील धडे दिले जाणार आहे. तसेच संकुलात येणार्या युवक-युवतींसाठी स्वतंत्र्यपणे वसतीगृहाची देखील सोय करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. विनायक इंगळे कुटुंबीयांच्या वतीने कुस्ती संकुलासाठी मानाची चांदीची गदा भेट देण्यात आली. पै.नाना डोंगरे यांनी मुलांप्रमाणे मुलींना देखील कुस्ती खेळात प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पोटे यांनी केले. आभार नाना डोंगरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment