नगरसेवक रविंद्र बारस्कर प्रभागातील विकास कामासाठी प्रयत्नशील ः महापौर वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 18, 2021

नगरसेवक रविंद्र बारस्कर प्रभागातील विकास कामासाठी प्रयत्नशील ः महापौर वाकळे

 नगरसेवक रविंद्र बारस्कर प्रभागातील विकास कामासाठी प्रयत्नशील ः महापौर वाकळे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः अहमदनगर महानगरपालिकेमध्ये भाजपाचा महापौर झाल्यापासून शहर विकासाला चालना मिळाली असून गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली फेज-2 पाणी योजना अंतिम टप्प्यात आली आहे. याचबरोबर पुढील 40 वर्षाचा विचार करून अमृत पाणी योजनेचे कामही लवकरच मार्गी लागेल. कोरोना संसर्ग विषाणूचे संकट असतानाही भरीव विकास कामे केली आहे. शहरातील प्रलंबित विकासाचे प्रकल्प मार्गी लावली आहेत. याचबरोबर शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गेली अनेक वर्षापासून प्रलंबित होता तो सोडवून भारत स्वच्छ अभियानामध्ये देशात 40 व्या क्रमांकावर नगर शहराने झेप घेतली आहे.  प्रभाग क्रमांक 6 च्या विकासासाठी नगरसेवक मा.श्री.रविंद्र बारस्कर नेहमीच प्रयत्नशील असतात. प्रभागामध्ये विविध योजना मार्गी लागाव्यात यासाठी पाठपुरावा करतात. आता लवकरच शहरामध्ये 35 हजार एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहे असे प्रतिपादन मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी केले.
   प्र.क्र. 6 चे नगरसेवक मा.श्री.रविंद्र बारस्कर यांच्या प्रयत्नातून सावेडी गांवठाण येथील 450 व्यासाची बंद पाईप गटर कामाचा शुभारंभ मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी विरोधीपक्ष नेता मा.श्री.संपत बारस्कर, नगरसेवक मा.श्री.रविंद्र बारस्कर, नगरसेविका मा.सौ.आशाताई कराळे, सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.विलास ताठे, मा.श्री.उदय कराळे, मा.श्री.गणेश नन्नवरे, अड.मा.श्री.महेश काळे, मा.श्री.विठ्ठल बारस्कर, मा.श्री.बाळासाहेब वाकळे, मा.श्री.बाबासाहब बारस्कर, मा.श्री.राजेंद्र बारस्कर,मा.श्री.भारत बारस्कर, मा.श्री.अशोकराव वाकळे, मा.श्री.भानुदास बारस्कर, मा.श्री.बबन बारस्कर, मा.श्री.किशोर बारस्कर, मा.श्री. शिवाजी बारस्कर,मा.श्री. बन्सी वाकळे, मा.श्री.अजित वाकळे, मा.श्री.नितीन बारस्कर, मा.श्री.संदिप बारस्कर मा.श्री.महादेव आढाव मा.श्री.गजानन बारस्कर, मा.श्री.जाधव मा.श्री.पुष्कर कुलकर्णी, मा.श्री. बाबासाहेब भिंगारदिवे, मा.श्री.दत्ता वाकळे, मा.श्री.पांडुरंग् बारस्कर मा.श्री.प्रकाश गोसावी, मा.श्री.अंकुश बारस्कर, मा.श्री.बाळासाहेब बारस्कर आदी उपस्थित होते.
   यावेळी नगरसेवक मा.श्री.रविंद्र बारस्कर म्हणाले की, सावेडी गांवठाण मध्ये ब-याच वर्षापासून या ड्रेनेज लाईनचा प्रश्न प्रलंबित होता. पूर्वीची ड्रेनेज लाईन खूप जुनी असल्यामुळे चेंबर मधून मैला मिश्रीत घाणपाणी रस्त्यावर व तीन मंदिरा समोर वाहत असल्यामुळे तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांच्या माध्यमातून सावेडी गांवचा ड्रेनेचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लावण्यासाठी मोठा निधी प्राप्त झाल्यामुळे ही कामे मार्गी लागली. प्रभागातील इतरही कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत. पुढील काळात प्रभाग क्र. 6 विकास कामातून समस्यामुक्त प्रभाग ओळखला जावून शहरा समोर विकासाचे मॉडेल उभे राहील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here