अंगणवाडीत मिळणारे शिक्षण हे आयुष्यातील महत्वाचा पाया ः आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 18, 2021

अंगणवाडीत मिळणारे शिक्षण हे आयुष्यातील महत्वाचा पाया ः आ. जगताप

 अंगणवाडीत मिळणारे शिक्षण हे आयुष्यातील महत्वाचा पाया ः आ. जगताप

हनुमाननगरमध्ये अंगणवाडी मंजूर झाल्याबद्दल अंगणवाडी सेविका सिंधू काटे यांचा सत्कार

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः  सामान्याचे प्रश्न कसे मिटतील याकडे सातत्याने लक्ष देत असतो.अंगणवाडीत मिळणारे प्राथमिक शिक्षण हे आयुष्यातील महत्वाचा पाया आहे. येथे घेतलेले शिक्षण सर्वसामान्याकरीता उपयुक्त ठरते.असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
   अंगणवाडी मंजूर झाल्याबददल अंगणवाडी सेविका सिंधू काटे यांचा सत्कार आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती लता शेळके, स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, नगरसेवक राहुल कांबळे, पै. सूरज शेळके,भास्करराव कराळे, रामचंद्र गुजर, बलभीम बचाटे, सुनील गायकवाड, हसन तांबोळी, अर्जुन धाडगे, गोरख जाधव, नामदेव चव्हाण, श्याम कांबळे आदी उपस्थित होते.
   अंगणवाडी सेविका सिंधू काटे म्हणाल्या, गेल्या कित्येक वर्षापासून हनुमाननगर भागात अंगणवाडी नसल्याने या प्रभागातील मुलांचे हाल होत होते. आमदार संग्राम जगताप व महिला व बालकल्याण समिती सभापती लता शेळके यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे. यामुळे हनुमाननगर परीसरातील या अंगणवाडीने मुलांना फायदा होईल.लता शेळके यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here