जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने जागतिक पंचवृक्ष मोहिमेचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 4, 2021

जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने जागतिक पंचवृक्ष मोहिमेचा शुभारंभ

 जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने जागतिक पंचवृक्ष मोहिमेचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः  जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी सुरु करण्यात आलेल्या जय हिंद वृक्ष बँकेच्या माध्यमातून जागतिक पंचवृक्ष मोहिमेचा शुभारंभ आर्दश गाव पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर वृक्ष बँकेवर संचालक मंडळाची नियुक्ती करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.
   फाऊंडेशनच्या वतीने पंचवृक्ष मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील डोंगराळ भागात पंचवृक्ष म्हणजे वड, पिंपळ, लिंब, उंबर, वेल  या पाच प्रकारचे प्रत्येकी 251 वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या 1250 झाडांपासून जागतिक पंचवृक्ष लागवडीचा ध्यास फाऊंडेशनचे सदस्य असलेल्या माजी सैनिकांनी घेतला आहे. याची जबाबदारी वृक्ष बँकेच्या संचालकांवर टाकण्यात आली असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी दिली.
जय हिंद वृक्ष बँकेच्या संचालकपदी ए.जी. मेहेत्रे, रावसाहेब आव्हाड, अमोल धाडगे, शैलेंद्र पांढरे, मुकुंद मोरे, कुशल घुले, अनिल ससे, संतोष मगर, आत्माराम दहातोंडे, गोरक्षनाथ काळे, अ‍ॅड.संदिप जावळे, शिवाजी गर्जे, कमलेश घोरपडे, भाऊसाहेब देशमाने, उद्धव थोटे, अ‍ॅड.अविनाश बुधवंत, देविदास येवले, एकनाथ माने, सचिन दहिफळे, आबासाहेब  साळवे, भरत खाकाळ, अमोल ढेपे, हरिशंकर खेडकर, रविंद्र चव्हाण, सचिन पवार, वसीम पटेल, अ‍ॅड. मयुर डोके,  निळकंठ उल्हारे यांची निवड करण्यात आली. या नवनिर्वाचित संचालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
   भास्करराव पेरे म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक पंचवृक्ष मोहिमेची संकल्पना प्रेरणादायी आहे. माजी सैनिकांनी देशसेवा करुन सामाजिक सेवेचा घेतलेला व्रत कौतुकास्पद आहे. पर्यावरणाचे समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन काळाची गरज आहे. जागतिक पंचवृक्ष मोहिम ही ऐतिहासिक ठरणार असून, इतिहासात याची नोंद होणार असल्याचे सांगितले. यावेळी जय हिंदचे शिवाजी पालवे, भाऊसाहेब कर्पे, जगन्नाथ जावळे, संभाजी वांढेकर, महादेव शिरसाठ, खंडेराव लेंडाळ, अंकुश भोस, महादेव झीरपे, मयुर नवगिरे, प्रतिक शिंदे, बंडू नागरगोजे, प्रल्हाद राठोड, आकाश औटी, नागरगोजे, रामकृष्ण काकडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment