तंबाखूमुक्त शाळा अभियान कार्यशाळा संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 4, 2021

तंबाखूमुक्त शाळा अभियान कार्यशाळा संपन्न

 तंबाखूमुक्त शाळा अभियान कार्यशाळा संपन्न

भावी पिढी तंबाखूमुक्त, व्यसनमुक्त रहावे याकरिता महाराष्ट्र शासनाने तंबाखूमुक्त शाळा अभियान हा उपक्रम सर्व शाळा, सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये राबविण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तंबाखू मुक्त शाळा अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत सर्व शैक्षणिक संस्थांना शासनाने घालून दिलेले नवीन निकष शाळेत पूर्ण करावयाचे आहेत. यापूर्वी तंबाखू मुक्त शाळा अभियानाचे 11 निकष ठरविण्यात आले होते परंतु त्यात आता आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय मार्फत बदल करण्यात आले असून नवीन नऊ निकष पारित करण्यात आले आहे.  

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः जिल्ह्यातील नगर तालुकास्तरीय तंबाखू मुक्त शाळा अभियान अंतर्गत नुकतीच जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यशाळेत शासनाने नव्याने समावेश केलेल्या नऊ निकषांबाबत माहिती देण्यात आली. शाळांमध्ये नऊ निकष कसे पूर्ण करता येईल याबाबत सलाम मुंबई फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक अजय चव्हाण यांनी शिक्षकांना प्रशिक्षण दिले. नगर तालुक्यातील 56 शाळांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला होता.
शाळेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होऊ नये याकरिता सरकारद्वारे राबवल्या जात असलेल्या यलो लाईन कॅम्पेन बाबतची माहिती राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. हर्षल पटारे यांनी दिली.
कार्यशाळा यशस्वितेकरिता एच यु एम संस्थेचे अतुल जाधव यांनी परिश्रम घेतले. हे प्रशिक्षण ऑनलाईन झूमअँपच्या माध्यमातून घेण्यात आले. यात नगर तालुक्यातील 56 शाळांनी सहभाग घेऊन लवकरच आपापल्या शाळा तंबाखू मुक्त करण्याबाबत निर्धार केला. लवकरच नगर तालुक्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त होतील अशी अपेक्षा कार्यक्रमातील सहभागी मान्यवरांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment