अहमदनगर अर्बन बँक चिंचवड शाखा घोटाळा... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 6, 2021

अहमदनगर अर्बन बँक चिंचवड शाखा घोटाळा...

 अहमदनगर अर्बन बँक चिंचवड शाखा घोटाळा...

संचालक सुरपुरीयाना अटक; बँक विश्वात खळबळ

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः कर्ज प्रकरणात नगर अर्बन बँकेची 22 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे नगर शहरात छापा टाकून बँकेचे संचालक नवनीत सुरापुरीया यांना ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात आरोपी असलेल्या इतर संचालकांचाही शोध सुरू आहे. गुन्ह्यात आरोपी असलेल्या इतर संचालकांचे धाबे दणाणले असून अटकेच्या भीतीने अनेकांनी पोबारा केला. बँकेवर सध्या प्रशासक असून माजी खासदार दिलीप गांधी यांच्या कार्यकाळातील हा घोटाळा आहे. कर्ज प्रकरणात मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून नगर अर्बन को. ऑप. बॅकेच्या चिंचवड शाखेची 22 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. 26 मार्च 2018 ते 25 जानेवारी 2021 या दरम्यान पावर हाऊस चौक, चिंचवडगाव येथील नगर अर्बन को. ऑप. बॅकेच्या शाखेत हा प्रकार घडला.
   याप्रकरणी कर्ज उपसमिती सदस्य, बँकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण (तिघेही रा. संभाजीनगर, चिंचवड), मंजुदेवी हरीमोहन प्रसाद (रा. शाहूनगर, चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिजित नाथा घुले (रा. बुरूडगाव रोड, अहमदनगर), कर्ज उपसमितीचे सदस्य, नगर अर्बन को. ऑप. बॅकेचे संचालक मंडळ सदस्य अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बँकेचे अधिकारी महादेव पंढरीनाथ साळवे (वय 56, रा. अहमदनगर) यांनी  पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी कर्ज घेणार्‍या चव्हाण यांना शुक्रवारी अटक केली आहे. या गुन्ह्यात बँकेचे संचालक मंडळही आरोपी असल्याने त्यांच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांचे पथक आज पहाटेच नगरमध्ये दाखल झाले. बँकेच्या एका संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. इतरांनाही ताब्यात घेऊन चौकशी केले जाणार असून गरज पडली तर त्यांना अटकही करण्यात येणार असल्याचे उपनिरीक्षक बाबर यांनी सांगितले. बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला,मात्र त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना नगर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. उद्या त्यांना चौकशीसाठी पिंपरी-चिंचवड येथे बोलावले आहे.

No comments:

Post a Comment