गौतम हिरण अपहरण प्रकरण...विरोधी पक्ष नेत्यांनी घेतली दखल! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 6, 2021

गौतम हिरण अपहरण प्रकरण...विरोधी पक्ष नेत्यांनी घेतली दखल!

 गौतम हिरण अपहरण प्रकरण...

विरोधी पक्ष नेत्यांनी घेतली दखल!
जिल्हा पोलीस प्रशासनाची धावपळ?

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः बेलापुर येथील व्यापारी गौतम हिरण बेपत्ता होवुन आज पाच दिवस झाले तरीही पोलीसांना त्यांचा ठावठिकाणा लागेना त्याच धर्तीवर शनिवार दिनांक 6 मार्च रोजी गाव बंदची हाक दिली आहे तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत हा मुद्दा उपस्थित केला त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील हे सायंकाळी आपल्या फौज फाट्यासह बेलापुर गावात दाखल झाले त्या नंतर त्यांनी हिरण यांचे गोडावुनला भेट दिली तसेच परिसरातील सि सि टी व्ही  फुटेजाची देखील पहाणी केली.
    गौतम हिरण यांच्या अपहरणा बाबतचा तपास सुरु असुन ग्रामस्था इतकी आम्हालाही काळजी आहे तपासासाठी वेगवेगळी पथके तयार केली असुन पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे जिल्हा पोलीस  प्रमुख मनोज पाटील यांनी ग्रामस्थांना सांगीतले. या घटनेत असणार्या साक्षीदारांशी देखील त्यांनी चर्चा केली त्या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे माजी सरपंच भरत साळुंके पत्रकार देविदास देसाई राम पौळ प्रशांत लढ्ढा प्रशांत शहाणे पंकज हिरण साहेबराव वाबळे योगेश नाईक राहुल लखोटीया प्रसाद खरात सचिन वाघ विशाल आंबेकरा अमोल गाढे संजय नागले  आदिंनी तपासा बाबत जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्याशी संवाद साधला त्या वेळी या घटनेचा लवाकरात लवकर तपास लावावा जस जसा तपासास उशीर होत आहे तशी आम्हा ग्रामस्थ व हिरण कुटुंबीयांची चिंता वाढत आहे त्यामुळे आपण जातीने लक्ष घालुन गौतम हिरण याचा शोध घ्यावा व आरोपीना तातडीने जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली या वेळी अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके पोलीस निरीक्षक संजय सानप उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here