सुनंदा ताई पवार यांनी केले निवड झालेल्या विद्यार्थ्याचे गुणगौरव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, March 7, 2021

सुनंदा ताई पवार यांनी केले निवड झालेल्या विद्यार्थ्याचे गुणगौरव

 सुनंदा ताई पवार यांनी केले निवड झालेल्या विद्यार्थ्याचे  गुणगौरव 



नगरी दवंडी

जामखेड-

गांधी रिसर्च फाउंडेशन अंतर्गत जवळा  गावातील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर तिसरा क्रमांक  पटकावला.इयत्ता पाचवी ते सातवी गटातील हे विद्यार्थी आहेत.या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या अभिमानास्पद यशाबद्दल सौ. सुनंदा ताई पवार यांनी सुफीयान जाकिर शेख ,साई संतराम सूळ  आणिअर्थव बापू खाडे यांचे कौतुक केले.या विद्यार्थ्यांनी  गणित विषयाचे अंकांचे कोडे हे मॉडेल तयार केले

करत त्यांना पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

              

              त्यांनी आपल्या भाषणात बोलताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की गेल्या वर्षभरपासून कोरोणा मूळे शाळा व अभ्यास ऑनलाईन सुरू आहे.तरीही विद्यार्थी न कंटाळता अभ्यास करतात हे कौतुकासपद आहे.पुढे बोलताना त्यांनी सांगितले ग्रामीण ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो कलागुणांना वाव मिळणाऱ्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे.तसेच कोरोना सारख्या आजारावर किंवा या सारख्या संसर्ग जण्या आजारावर मात व्हावी,प्रतिकार  शक्ती प्रबळ करण्यासाठी व्यायाम करा व योगासने गरा असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक गरड सर, तसेच विद्यालयाचे स्कूल कमिटी अध्यक्ष शहाजी पाटील,जवळा गावचे सरपंच प्रशांत शिंदे,उपसरपंच काका वाळुंजकर, दीपक पाटील, स्कूल कमिटी सदस्य बाजीराव पठाडे, स्कूल कमिटी सदस्य राजेंद्र राऊत, जाकीर शेख, संतराम सूळ, नाना रोडे, बापू खाडे,इत्यादी गावातील ज्येष्ठ उपस्थित होते.या प्रकल्पासाठी विद्यालयातील भोंडवे सर,ओव्हाळ सर , पाचपुते मॅडम , शिंदे मॅडम व शिंदे सर या तज्ज्ञ शिक्षकांचे व विद्यालयातील सर्वच शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment