बोठेची पोलिस कस्टडीची मुदत संपली. पारनेर न्यायालयात केले हजर! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 20, 2021

बोठेची पोलिस कस्टडीची मुदत संपली. पारनेर न्यायालयात केले हजर!

 बोठेची पोलिस कस्टडीची मुदत संपली. पारनेर न्यायालयात केले हजर!


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपत असल्यामुळे त्याला पारनेर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. अहमदनगर मधील बहुचर्चित रेखा जरे हत्याप्रकरणानंतर बाळ बोठे 3 महिन्यापासून  फरार होता . अहमदनगर पोलिसांनी त्याला शिताफीने हैदराबाद येथून दि. 13 मार्च 2021 रोजी ताब्यात घेतले होते यानंतर पारनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या कोठडीची मुदत आज संपल्याने पोलीस त्याला आज पारनेर तालुक्यात हजर केले.

बाळ बोठेला अटक केल्यानंतर त्याचाकडून सुरुवातीला तपासाला पोलिसांना अपेक्षित प्रतिसाद देत नसल्याची माहिती समोर आली होती.  त्यानतंर अहमदनगर शहरातील विविध ठिकाणी पोलिसांनी तपासणीसाठी नेले होते. तर दुसरीकडे त्याचा सुरुवातीला जप्त केलेला मोबाईल हा उघडण्यासाठी सायबर विभागाच्या एका टीमला पाचारण करण्यात आले असून, तो फोन कशा पद्धतीने उघडला जातो यासाठी पोलीस प्रयत्नात आहेत. तर याच घटनेतील आरोपी महेश तनपुरे याच्याकडे असलेले त्याचे फोन फॉरेन्सिक लॅबकडे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आज पोलिस कोठडीची मुदत संपत असल्यामुळे त्याला हजरकरण्यात आलेे. बोठे याच्याकडे असलेला आयफोन हा उघडत नसल्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये तो फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment