कर्जत तालुक्यातील पोलीस पाटील यांचा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 20, 2021

कर्जत तालुक्यातील पोलीस पाटील यांचा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते सत्कार

 कर्जत तालुक्यातील पोलीस पाटील यांचा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते सत्कार


कर्जत ः
पोलीस अधिक्षक  मनोज पाटील यांनी कर्जत पोलीस स्टेशन या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी  कर्जत तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल सर्वाचा सत्कार करण्यात आला. कर्जत तालुक्यातील पोलीस पाटील पोलीस स्टेशनला लागणारी अत्यावश्यक व गोपनीय माहिती तात्काळ पुरवतात. सर्व पोलीस पाटील हे समन्स बजावणी करून पोलीस प्रशासनास सहकार्य करत आहेत. गावात कुठेही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत असल्यास पोलीस प्रशासनाला मदत करून पोलीस स्टेशनला कळवतात. गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करणे व गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करून त्यांच्या मार्फत गावात पेट्रोलिंग करणे व नाकाबंदी करून घेतात अशी विविध प्रकारची मदत पोलीस पाटलांकडून होत असल्याने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी त्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे मांडला. त्यांनीही तात्काळ त्यास मान्यता दिली. कर्जत येथे पोलीस पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये
गोरख जमदाडे :कोळवडी ,श्रीकांत फाळके : कोरेगाव ,बिबीशन अनारसे : आंबीजळगाव ,दसरथ सायकर :अखोनी ,शरद भापकर :कोंभळी, काकासाहेब बेद्रे:सुपा
बबन  गांगर्डे : निमगाव गां, उदय मोरे :खेड ,सुनील साळवे : चिंचोली रमजान ,ईश्वर जोगदंड :थेरगाव ,अण्णासाहेब सांगळे : जलालपुर ,महेश कदम : माहीजळगाव
महेंद्र करपे :वालवड ,शिवाजी वायशे :खांडवी ,हनुमंत पंडीत :राक्षसवाडी ,अशोक कोपनर :राक्षवाडी खु,सौ जयश्री वाघमारे : माळंगी ,सौ वैशाली तिखे :चांदे सौ संगीता भोसले :दुधोडी ,प्रफुल्ला महामुनी :बाभळगाव ,सौ वर्षा मांडगे :रेहकुरी ,सौ अलका पांडुळे : घुमरी आदीचा सत्कार करण्यात करण्यात आला.

No comments:

Post a Comment