‘सिंधी जनरल पंचायत’च्या अध्यक्षपदी महेश मध्यान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 20, 2021

‘सिंधी जनरल पंचायत’च्या अध्यक्षपदी महेश मध्यान

 ‘सिंधी जनरल पंचायत’च्या अध्यक्षपदी महेश मध्याननगर-
येथील पुज्य सिंधी जनरल पंचायत च्या अध्यक्षपदी महेश गिरधारीलाल मध्यान यांची एकमताने निवड करण्यात आली. सिंधू मंगल कार्यालय येथे समाज बांधवांच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.  सिंधी जनरल पंचायतचे माजी अध्यक्ष गिरधारीलाल उर्फ लालूशेठ मध्यान यांच्या निधनाने रिक्त असललेल्या पदासाठी समाजातील प्रमुख मान्यवरांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते नूतन अध्यक्ष महेश मध्यान यांचा सत्कार करण्यात आला.

   सत्कारास उत्तर देतांना महेश मध्यान म्हणाले, आजोबा स्व.राधाकिसन मध्यान व वडिल स्व.गिरधारीलाल मध्यान यांनी चालविलेला समाजसेवेचा वारसा मी यापुढेही सुरु ठेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून, समाज हितासाठी सर्वानुमते योग्य निर्णय घेऊन विविध उपक्रम, योजना आखल्या जातील. त्यासाठी सर्व समाज बांधवांच्या संपूर्ण सहकार्याची अपेक्षा व्यक्त करीत, एकजुटीने कार्य केली जातील. लवकरच नूतन पदाधिकार्यांची व कार्यकारिणी समितीची निवड करण्यात येईल, असे सांगितले.
या बैठकीस दामोदर बठेजा, सुरेश हिरानंदानी, आनंद कृष्णानी, नानकराम मटलाई, कुमार गाबरा, प्रदीप आहुजा, बन्सी आसनानी, रामशेठ मेंघानी, सुरेश कटारिया, जयकुमार रंगलानी, रुप मोटवाणी, किशन पंजवानी, किशोर खुबचंदानी, जयराम गाबरा, सुनिल बजाज, लिलाराम खुबचंदानी, रमेश कुकरेजा, प्रकाश तलरेजा, दिपक तलरेजा आदि मान्यवर उपस्थित होते.
   महेश मध्यान यांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीचे समाजाच्या सर्व स्थरातून अभिनंदन होत असून, महेश यांच्या नि:स्वार्थ समाजासेवेची ही पावती मिळाली असल्याची भावना व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here