रोटरी प्रियदर्शनी आयोजित निबंध स्पर्धेत मानसी नागूल हिला प्रथम पारितोषिक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 9, 2021

रोटरी प्रियदर्शनी आयोजित निबंध स्पर्धेत मानसी नागूल हिला प्रथम पारितोषिक

 रोटरी प्रियदर्शनी आयोजित निबंध स्पर्धेत मानसी नागूल हिला प्रथम पारितोषिक


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः रोटरी क्लब ऑफ अमदनगर प्रियदर्शनीच्यावतीने आयोजित ‘कोरोना महामारीतून आपण काय शिकलो’ या विषयावरील निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक मानसी नागुल (इ. दहावी, बजरंग माध्यमिक विद्यालय) हिने पटकावले आहे. द्वितीय पारितोषिक अंजली बापू माने (इ. नववी, सन फार्मा विद्यालय) तर तृतीय पारितोषिक मुग्धा उमेश घेवरीकर (इ. नववी, बाळासाहेब भारदे हायस्कूल शेवगाव) या विद्यार्थीनींनी मिळवले आहे. या स्पर्धेत  70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकूण 13 स्पर्धकांची पारितोषिकासाठी निवड झाली. विशेष म्हणजे जवळपास सर्वच पारितोषिके मुलींनी मिळवत आपली प्रगल्भता अधोरेखित केली.   
   स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाल्याने तसेच अनेकांनी उत्कृष्ट निबंध सादर केल्याने उत्तेजनार्थ गटातही प्रथम, व्दितीय अशी पारितोषिक देण्यात आली. या स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रथम पलक प्रशांत चोपडा (इ. आठवी, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल) व  उत्कर्ष नितीनकुमार शेटीया (इ. आठवी, कार्मल कॉन्व्हेंट स्कूल) द्वितीय उत्तेजनार्थ निकिता आदिनाथ लिपणे (बजरंग विद्यालय) व अलजिया याकुब शेख (इ. दहावी, भाऊसाहेब फिरोदिया), तृतीय उत्तेजनार्थ मानसी अनिल लाटे (इ. नववी, श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल) व तेजल विकास गायकवाड (इ. नववी, श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालय, नान्नज दुमाला) यांना तर उत्तेजनार्थ पारितोषिक कांचन बाबासाहेब मराठे ( इ. दहावी, नवनाथ विद्यालय, करंजी, ता. पाथर्डी), पूर्वा विनोद कंदूर (इ. आठवी, श्रीराम कृष्ण फाउंडेशन), सुखद संजय वराळे (इ. आठवी, ज्ञानसंपदा स्कूल), योजित सचिन बोगावत (श्री रामकृष्ण फाउंडेशन) यांनी मिळवले. स्पर्धेचे परीक्षण अनुरिता झगडे यांनी केले.
   स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांनी मनापासून भरभरून लिहिले आणि म्हणूनच त्यांच्या या भावनांना आणि त्यांच्या सुप्तगुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून जास्तीत जास्त पारितोषिके देण्याचा प्रयत्न प्रियदर्शनीने केला आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 10 मार्च रोजी दुपारी 4.30 वाजता होणार आहे.  जे विद्यार्थी बाहेरगावी राहतात आणि ज्यांना यायला जमणार नाही, त्यांची पारितोषिक नगरमध्ये मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  विद्यार्थ्यानी स्पर्धेत निबंध सादर करताना अतिशय सुंदर विचार मांडले.  शिक्षक, खडू, फळाशिवाय पर्याय नाही शिक्षणाला, पारंपारिक पद्धतीने जे महत्त्व आहे तेच खरे,   प्रत्येक अडचणी सोबत संधी येतात, प्रदूषण कमी करा. देशातील माणुसकी या कोरोना काळात दिसली, स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित झाले,  निसर्गाला गृहीत धरू नका त्याची काळजी घ्या,  निसर्गापुढे कोणाचेच चालत नाही,  एकमेकांपासून लांब राहात असलो तरी मनातून जवळच आहोत हे जाणवू लागले,  डॉक्टरांच्या दोन्ही बाजू दिसल्या, अन्न पाण्याची नासाडी करू नका आणि स्वातंत्र्य काय असते याचेही महत्व समजले अशा अनेक भावना  निबंधातून प्रकट झाल्या. रोटरी प्रियदर्शनीच्या अध्यक्षा गीता गिल्डा,  प्रतिभा धूत,  सेक्रेटरी देवीका रेळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख शांता येळंबकर व सर्व रोटरियन्सनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. बक्षीस वितरण समारंभ तसेच पारितोषिक नेण्यासाठी अधिक माहितीसाठी विजेत्यांनी 7028046868 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here