शाळाबाह्य विशेष शोध मोहिमेला स्थगिती देण्याची शिक्षक भारतीची मागणी ः गाडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 9, 2021

शाळाबाह्य विशेष शोध मोहिमेला स्थगिती देण्याची शिक्षक भारतीची मागणी ः गाडगे

 शाळाबाह्य विशेष शोध मोहिमेला स्थगिती देण्याची शिक्षक भारतीची मागणी ः गाडगे

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहीम  मार्च 2021 या महिण्यात  व्यापक स्वरुपात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार विशेष शोध मोहीम राबविण्यासाठी सध्या योग्य ती परिस्थिती वातावरण अस्तित्वात नाही. महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण पुन्हा
   वाढण्यास सुरुवात झाली आहे. ही शोध मोहीम राबविणारे शिक्षक व कर्मचार्‍यांच्या जीविताला धोका निर्माण होणार आहे. कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे विशेष शोध मोहीम प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी केली आहे . या शोध मोहिमेकरिता शिक्षक गाव, वस्त्यांमध्ये गेल्यास नागरिकांना व पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते . तसेच  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होण्याचा धोका आहे.
   एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी राबविण्यात येणार्‍या विशेष शोध मोहीमेद्वारे शिक्षकांना त्रास देण्याचा  प्रकार केला जात असल्याचा आरोप करुन या शोध मोहीमेला त्वरीत स्थगिती देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती च्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन शिक्षक आमदार कपिल पाटील राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड   यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना  दिले आहे अशी  माहिती शिक्षक नेते सुनील गाडगे,जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, उर्दू विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहमंद समी शेख. उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु ,जिल्हा माध्यमिकचे  सचिव विजय कराळे , कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे,उच्च माध्यमिक चे जिल्हा सचिव महेश पाडेकर,  संभाजी पवार , ,हनुमंत  रायकर ,सुदाम दिघे, संतोष देशमुख . संजय तमनर . संभाजी चौधरी. नवनाथ घोरपडे. गोरखनाथ गव्हाणे. सोपानराव कळमकर. संजय भूसारी.शंकर भिवसने ., कैलास जाधव , महिला सचिव विभावरी रोकडे . कार्याध्यक्ष मिनाक्षी सूर्यवंशी. रोहिणी भोर शकुंतला वाळुंज, छाया लष्करे. जया गागरे. संध्या गावडे. अनघा सासवडकर, आदींनी सांगीतले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here