जबाबदार्‍या पार पाडताना महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी ः सौ. घुले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 9, 2021

जबाबदार्‍या पार पाडताना महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी ः सौ. घुले

 जबाबदार्‍या पार पाडताना महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी ः सौ. घुले

जिल्हा परिषदेत महिला कर्मचार्‍यांचा सन्मान

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः नोकरी करणार्या महिला कार्यालयीन व कौटुंबिक जबाबदार्‍या तितक्याच समर्थपणे पार पाडत असतात. नगर जिल्हा परिषदेत अनेक महिला अधिकारी, कर्मचारी आपले कर्तव्य उत्तम रीतीने बजावतात. दुहेरी जबाबदारी पार पाडताना महिलांनी स्वताच्या आरोग्याबाबत सजग राहिले पाहिजे. स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. त्यांचे आरोग्य चांगले असेल तर त्या अधिक कार्यक्षमतेने व आनंदी राहून काम करतील असे प्रतिपादन जि.प.अध्यक्षा राजश्री घुले पाटील यांनी केले.
   जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद मधील विविध विभागात कार्यरत असणार्‍या सर्व महिला कर्मचार्‍यांचा जि.प अध्यक्षा घुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,महिला व बाल कल्याण सभापती मिरा शेटे,सभापती काशिनाथ दाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांची उपस्थिती होती.
   सभापती मिरा शेटे म्हणाल्या की, महिला दिनानिमित्त महिला कर्मचार्याचा सन्मान करताना खूप आनंद होत आहे. महिलांना काय आणि किती काम असते हे कोरोना काळात घरी असताना सर्वांच्याच लक्षात आले. नारी शक्तीचे महत्व मोठे आहे. घर व्यवस्थित सांभाळणार्‍या महिला गाव,तालुका जिल्हा,राज्य देश निश्चितच व्यवस्थित सांभाळू शकतात.
    महिलांना जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा त्या स्वःताला सिद्ध करून दाखवतात.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कदम यांनी केले.  करोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशांनुसार सोशल डिस्टन्सिंग तसेच अन्य नियम पाळून महिला दिन साजरा करण्यात आला.

No comments:

Post a Comment