महिलांनी महिलांचे शत्रू बनू नये- न्या. नेत्रा कंक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 11, 2021

महिलांनी महिलांचे शत्रू बनू नये- न्या. नेत्रा कंक

 जागतिक महिला दिनानिमित्त भरोसा सेलकडून कार्यक्रमाचे आयोजन

महिलांनी महिलांचे शत्रू बनू नये- न्या. नेत्रा कंक

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः जागतिक महिला दिनानिमित्त दिलासा हॉल येथे महिलांना कायदेविषयक व महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस उपअधीक्षक (गृह) श्रीमती प्राजक्ता सोनवणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
   या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून नगरच्या कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती नेत्रा कंक, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एस. पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती आर. आर. देशपांडे उपस्थित होत्या. या मान्यवरांनी उपस्थित महिलांना कायदेविषयक, तसेच महिला सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी उपस्थित होत्या. सरस्वतीपूजनाने व दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
   न्यायाधीश नेत्रा कंक म्हणाल्या की, भरोसा सेलच्या माध्यमातून सुरू असलेले काम प्रशंसनीय आहे. पती-पत्नीमधील वाद आपआपसांत मिटविण्यासाठी प्रयत्न केले जातात. न्यायदंडाधिकारी एस. एस. पाटील म्हणाल्या की, भरोसा सेल आपले काम चोखपणे करीत असल्यामुळे आज अनेकांचे संसार उद्धस्त होण्यापासून वाचले आहेत. पती-पत्नीतील विसंवाद दूर झाला पाहिजे. संवादाने अनेक प्रश्न सुटू शकतात. सोशल मीडियाचा जनजीवनावर खूप मोठा परिणाम झाला आहे. मोबाईलचा अतिवापर टाळणे गरजेचे आहे. स्वतः स्वतःवर काही निर्बंध लादून त्याप्रमाणे मार्गक्रमण केल्यास आपल्यापासून इतरांना काही त्रास होणार नाही. शिवाय तुमचे जीवन अधिक आनंदी होईल, असे सांगितले.
   अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल म्हणाले की, पुरुषांच्या बरोबरीने आज प्रत्येक क्षेत्रात महिला काम करीत आहेत. पुरुषांनी महिलांचा आदर करायला शिकले पाहिजे. महिलांचा आदर केल्यास त्यांच्यावरील अत्याचार निश्चितच कमी होईल. आज चूल व मूल येथपर्यंतच महिला राहिलेल्या नसून प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत, असे सांगितले.
   पोलीस उपअधीक्षक श्रीमती प्राजक्ता सोनवणे म्हणाल्या की, जागतिक महिला दिनानिमित्त भरोसा सेलने आयोजित केलेला आजचा हा कार्यक्रम खर्या अर्थाने आगळावेगळा ठरला आहे. सद्य परिस्थितीचा विचार करून सॅनिटायझर व मास्क देऊन सत्कार करण्यात आला. यामुळे समाजाला सद्य परिस्थितीची व कोरोना-या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला, तसेच पोलीस दलात मागील वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणार्या 30 महिला अधिकारी व अंमलदार यांचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देण्याऐवजी कोविड-19चा वाढता प्रभाव लक्षात घेता सॅनिटायझर व मास्क देऊन सत्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनाचा हा कार्यक्रम भरोसा सेलच्या प्रभारी अधिकारी पल्लवी देशमुख-उंबरहंडे, भरोसा सेलचे महिला व पुरुष अंमलदार यांनी कोविड-19च्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून यशस्वीपणे पार पाडला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here