चांगल्या कार्यामुळेच घुले यांना पदाचा मान ः फिरोदिया - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 11, 2021

चांगल्या कार्यामुळेच घुले यांना पदाचा मान ः फिरोदिया

 चांगल्या कार्यामुळेच घुले यांना पदाचा मान ः फिरोदिया

जय मातादी ग्रुपच्यावतीने सत्कार

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
आपण आपले काम करत असतांना सामाजिक दायित्व प्रत्येकाने जपले पाहिजे. जय मातादी ग्रुपचे सदस्य नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी होत असतात. ग्रुपच्या सदस्यांनी मिळालेले यश ही सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. अविनाश घुले यांनी आपल्या कामाने समाजात वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या चांगल्या कार्यामुळेच त्यांना विविध पदांचा बहुमान मिळत आहे, असे प्रतिपादन जय माता दी ग्रुपचे राजेंद्र फिरोदिया यांनी केले.
   मनपा स्थायी समितीच्या सभापतीपती अविनाश घुले यांची निवड झाल्याबद्दल जय मातादी ग्रुपच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राजेंद्र फिरोदिया, अमोल शिंगी, सचिन खिस्ती, राजेश देशमुख, किशोर फिरोदिया, मनोज शहा, संतोष भंडारी, विनय खिस्ती, बाळासाहेब खेडकर, सुरेश काबरा, राजेंद्र वर्मा, सागर काबरा,  राजेश भंडारी, निमेश राछ, निलेश बोरा आदि उपस्थित होते.
   याप्रसंगी अविनाश घुले यांनी सत्काराबद्दल ग्रुपचे आभार मानून सर्व मित्र परिवाराच्या सहकार्याने आपणास वेगवेगळया क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत आहे. मिळालेल्या पदाच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासात भर घालण्याचे काम करु. जय माता दी ग्रुपच्या सहकार्याने सामाजिक उपक्रमा राबवू, असे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here