मनपा शिक्षक संघाच्या वतीने महिलांचा सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 11, 2021

मनपा शिक्षक संघाच्या वतीने महिलांचा सन्मान

 मनपा शिक्षक संघाच्या वतीने महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनी मनपा शिक्षक संघाचा स्तुत्य उपक्रम

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अहमदनगर मनपा शिक्षक संघाच्या वतीने महिलांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनिषा शिंदे,भारती कवडे,समिना खान, ज्योती गहिले होत्या. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे,मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार,पर्यवेक्षक जुबेर पठाण उपस्थित होते.यावेळी महानगरपालिका शिक्षण विभागातील सर्व महिला शिक्षिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरवपत्र व रोपटे देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे राज्यसरचिटणीस अरुण पवार, अहमदनगर जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब कबाडी, संघाचे मार्गदर्शक शशिकांत वाघुलकर,मनपा शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अक्षय सातपुते, जिल्हा कोषाध्यक्ष अमोल बोठे उपस्थित होते.
   मनिषा शिंदे यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तसेच जनशिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समिती उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.छाया गोरे,समिना खान, मनिषा गिरमकर,वर्षा दिवे यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच जनशिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल वर्षा लोंढे यांचा सन्मान करण्यात आला.त्याचप्रमाणे अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ,सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महानगरपालिका प्राथमिक शाळा आदर्शनगर शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.तसेच महानगरपालिका ओंकारनगर शाळेला राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.रोटरी क्लबच्या वतीने नेशन बिल्डर अवार्ड मिळाल्याबद्दल संदिप राजळे व शिवराज वाघमारे यांचाही सत्कार करण्यात आला.
   जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महानगरपालिका शिक्षक संघाने सर्व महिला शिक्षिकांचा सन्मान केला.हा एक स्तुत्य उपक्रम आहे.स्रियांचे समाजातील स्थान अनन्यसाधारण आहे,असे मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार म्हणाले. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज आपण महिलांना वेगवेगळ्या पदांवर उल्लेखनीय कार्य करताना पाहत आहोत.फक्त एक दिवस महिलांचा सन्मान न करता आपण दररोज त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे.आजही पुरुषी मानसिकता फारशी बदललेली दिसत नाही.कारण आजही आपल्या अवतीभवती स्त्री भ्रूणहत्या, बलात्कार, हुंडाबळीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत.म्हणून पुरुषी मानसिकता बदलणे आवश्यक आहे,असे मनपा कर्मचारी युनियन अध्यक्ष अनंत लोखंडे आपल्या मनोगतात म्हटले. यावेळी मनिषा शिंदे, छाया गोरे, सिमा म्हस्के यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सप्तरंग प्रिंटवल्डचे नंदेश शिंदे यांनी सर्व महिलांसाठी मोफत गौरवपत्र तयार करून दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण पवार यांनी केले.पाहुणे परिचय अक्षय सातपुते यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भाऊसाहेब कबाडी यांनी केले.तर अमोल बोठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व मनपा शिक्षकांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here