‘आपला मान आपला अभिमान’ हे पुस्तक खरी राष्ट्रभक्ती शिकवते ः विठ्ठल बुलबुले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 23, 2021

‘आपला मान आपला अभिमान’ हे पुस्तक खरी राष्ट्रभक्ती शिकवते ः विठ्ठल बुलबुले

 ‘आपला मान आपला अभिमान’ हे पुस्तक खरी राष्ट्रभक्ती शिकवते ः विठ्ठल बुलबुले


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या भारताची उदात्त संस्कृती व दिव्य परंपरा, आपले स्वातंत्र्य, प्राणा पलिकडे प्रिय असणारा आपला राष्ट्रध्वज, अहिंसेचा संदेश देणारी राजमुद्रा, राष्ट्रगीत, सत्याचा मार्ग दाखविणारा ’सत्यमेव जयते’ हा राजघोष, लोकशाहीवर आधारलेली आपली राज्यघटना, ही सर्व स्वतंत्र भरताच्या वैभवाची प्रतीके आहेत. या प्रतिकांचा परिचय यदुनाथथत्ते यांनी ‘आपला मान आपला अभिमान’ या पुस्तकातअत्यंत जिव्हाळ्याने करून दिला आहे म्हणून हे पुस्तक भावसाक्षरते बरोबर खरी राष्ट्रभक्ती शिकवते असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक व प्रेरणादायी वक्ते  विठ्ठल बुलबुले यांनी केले.थोर विचारवंत व स्वातंत्र्य सेनानी यदुनाथ थत्ते यांच्या जन्मशताब्दी निमित्त राष्ट्र सेवा दलाने त्यांचे ‘आपला मान आपला अभिमान’ हे पुस्तक प्रकाशित केले. त्याचे प्रकाशन यदुनाथ थत्ते यांच्या प्रतिज्ञा या पुस्तकावर 1000 व्याख्याने देऊन त्यांचा वैचारिक वारसा पुढे नेणारे अहमदनगरचे कार्यकर्ते विठ्ठल बुलबुले यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी कवयित्री सुरेखा घोलप, प्राचार्य अपर्णा क्षीरसागर-राऊत, कल्पना बुलबुले, शिक्षिका रेखा डोळस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या तर अध्यक्षस्थानी प्रा.संगीताताई गाडेकर- मिसाळ या होत्या.
    बुलबुले पुढे म्हणाले, कुठलेही माप लावले तरी हा देश जगातल्या इतर देशाहुन वेगळा आहे काळाचे माप लावा की स्थळाचे. जगातल्या इतर देशांत अंधारयुग होते, तेव्हा या देशात सांस्कृतीची सुप्रभात झाली होती. आजच्या युगासाठी जी वैचारिक वा भावनिक बैठक हवी ती निर्माण करण्याची क्षमता या पुस्तकात आहे वभारतीय संविधान आणि राष्ट्रीय प्रतीके यांचे अर्थ सांगणारे आहे. आजच्या काळात या पुस्तकाची गरज जास्त आहे. असेही ते म्हणाले.
प्राचार्या अपर्णा क्षीरसागर म्हणाल्या विज्ञान युगाला सामोरे जाण्यासाठी विज्ञानसंस्काराची जपणूक व संवर्धन कसे करता येईल याचे प्रशिक्षण हे पुस्तक देतेहे पुस्तक घराघरात व शाळेशाळेत असावे असेही त्या म्हणाल्या. कवयित्री सुरेखा घोलप म्हणाल्या उमलत्या पिढीत राष्ट्रीय अस्मिता, डोळसपणे जागी करून राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेने नवीन धडपड करण्याची प्रेरणा हे पुस्तक वाचकांना देते.
   अध्यक्षीय भाषणात प्रा. संगीताताई गाडेकर म्हणल्या आपण सारे भारतीय एक आहोत भिन्न भाषा, भिन्न धर्म, भिन्न पंथ, किंवा भिन्न जाती असल्या तरी सर्वांमध्ये एकच भारतीय आत्मा आहे,आपण सर्वजण भारत मातेची लेकरे आहोत. आपल्याला देशा बद्दल प्रचंड अभिमान असतो देशांच्याप्रतीकांबद्दल अभिमान असतो मात्र त्या बाबतची जुजबी माहिती देखील जेमतेमच आपल्याला असते हे पुस्तक ती उणीव भरून काढते. या पुस्तकाच्या वाचनाने आपण समृद्ध होतो असेही त्या शेवटी म्हणाल्या. यावेळी कल्पना बुलबुले व रेखा डोळस यांनी पुस्तकातील काही प्रकरणांचे वाचन केले.
   छोटेखानी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनत्रिशाली तोटा यांनी केले तर आभार अंबादास कोडम यांनी मानले.

No comments:

Post a Comment