जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पदाचा उपयोग करावा ः जगधने - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 23, 2021

जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पदाचा उपयोग करावा ः जगधने

 जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पदाचा उपयोग करावा ः जगधने

लहुसंग्राम प्रतिष्ठानतर्फे नुतन पदाधिकार्‍यांचा सत्कार

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सामाजिक चळवळीत काम करत असताना आपल्या पक्ष संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य व तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी  पदाधिकार्‍यांनी पुढाकार घ्यावा.जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पदाचा उपयोग करावा,असे विचार लहुसंग्राम प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राकेश जगधने यांनी मांडले.
माणगाव परिषद या ऐतिहासिक दिनाला 101 वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्य साधून भिंगार येथे लहुसंग्राम प्रतिष्ठानच्या वतीने वंचित बहुजन आघाडी चे नुतन शहराध्यक्षपदी विकास चव्हाण व दलित महासंघाचे नुतन शहराध्यक्षपदी सुरेंद्रसिंग घारु यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर गायकवाड, उपाध्यक्ष राकेश जगधने, प्रसिद्धीप्रमुख पवन वाघमारे,मानस प्रतिष्ठानचे विशाल बेलपवार,जनजागरण मंडळाचे अध्यक्ष आकाश लोखंडे उपाध्यक्ष आकाश साबळे, हर्षद शिर्के, नाना घडसिंग, रोहित पाटोळे, सूरज उमाप यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
   पुढे आपले विचार मांडताना सागर गायकवाड म्हणाले, की समाजाच्या न्याय हक्कासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here