पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत नगरसेवक शाम नळकांडेची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 16, 2021

पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत नगरसेवक शाम नळकांडेची मागणी

 पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत नगरसेवक शाम नळकांडेची मागणी

कल्याण रोड परिसराला केडगाव लाईन मधून पाणी द्या.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः कल्याण रोड परिसरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी केडगावला पाणी पुरवठा होत असलेल्या लाईन वरून पाणी देण्याची मागणी नगरसेवक शाम नळकांडे यांनी केली आहे.
   स्थायी सभापती अविनाश घुले यांचे अध्यक्षतेखाली पाणी पुरवठा विभागाची काल बैठक झाली. या बैठकीत नळकांडे यांनी कल्याण रोड परिसरातील पाणी प्रश्नाचा प्रश्न उपस्थित केला. याप्रसंगी नळकांडे म्हणाले की, केडगाव साध्या जे पाणी दिले जाते, ते सुरूच ठेवावे त्यांच्या पाण्यात कपात न होता, ज्या दिवशी केडगावला पाणीपुरवठा होत नाही, त्यादिवशी या लाईन वरून पाणी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. केडगावला सध्या नागापूर येथून 400 एमएमच्या वाहिनीवरून पाणी दिले जाते. या पाण्यात वाढ करून जादाचे पाणी कल्याण रोडला दिल्यास केडगावच्या पाणी पाणीपुरवठ्याला अडथळा येणार नाही व कल्याण रोडचा ही पाणी प्रश्न मार्गी लागेल, असा पर्याय उपायुक्त डांगे यांनी सुचविला. यासंदर्भात काय करता येईल, या बाबत उपाययोजना कराव्यात, असे आदेश आयुक्तांनी दिले. केडगावच्या लाईन वरून कल्याण रोडला पाणी देण्यासाठी टाकावी लागणारी पाईप लाईन 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून टाकावी, असेही यावेळी सुचविण्यात आले. यावेळी आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख रोहिदास सातपुते, यंत्र अभियंता परिमल निकम आदींसह पाणीपुरवठा विभागाचे अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment